सामाजिक
कोपरगाव तालुका आंबेडकर चळवळीतील नेतृत्व जितेन्द्र रणशूर
कोपरगाव तालुका आंबेडकर चळवळीतील नेतृत्व जितेन्द्र रणशूर
कोपरगाव तालुका आंबेडकर चळवळीत नेहमी अग्रेसर असणारा तालुका आहे.अहमदनगर जिल्ह्यात समाज मोठ्या संख्येने असुन कोपरगाव तालुका चळवळीत नेहमी पुढे असतो कोपरगाव तालुक्यात आंबेडकर चळवळीत अनेक कार्यकर्ते घडले आहे.या कार्यकर्त्यामध्ये जितेन्द्र रणशूर यांचे नाव आदराने घेतले जाते.समाजातील कोणाचेही सुख दुःख असो भाऊ नेहमी सहभागी होत असतात.समाज बांधवासह कोणाचेही अडीअडचणी असो ते नेहमी धावुन जातात.प्रेमळ स्वभाव अशी त्यांची ओळख आहे.रिपब्लिकन चळवळ शहरासह ग्रामीण भागात त्यांनी पोहचविण्यासाठी मोठे प्रयत्न केले.शहरातील अनेक तरुण एकत्र करुन त्यांनी मोठे कार्य आंबेडकर चळवळीत केले आहे.आज त्यांचा २६ जानेवारीला वाढदिवस असुन त्यांच्या वाढदिवसाच्या त्यांना हार्दिक शुभेच्छा


