सामाजिक

सहकारी साखर उद्योगाचा संजीवक बिपिन दादा कोल्हे— नारायण अग्रवाल

सहकारी साखर उद्योगाचा संजीवक बिपिन दादा कोल्हे— नारायण अग्रवाल

कायमस्वरूपी दिवसेंदिवस सहकारी साखर उद्योग प्रचंड प्रमाणात अडचणीत येत असतांना व देशात दरवर्षी विक्रमी व महाराष्ट्रात आजही दररोज आठ शेतकरी आत्महत्या घडत असतांना कोपरगांव तालुक्यात दर पाच वर्षांत दोन वर्षे दुष्काळ पाचवीला पुजल्याने या परिसरात स्वतंत्र पाणी स्त्रोत उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत दारणा व गंगापूर धरणाच्या कोपरगांव तालुक्याच्या हक्काचे 11टी. एम.सी. पाणी कोपरगांव तालुक्या बाहेर पळविले गेले.अशा भिषण परिस्थितीत कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिन दादा कोल्हे यांनी आपले सर्वस्व पणाला लावून वेळप्रसंगी स्वशासनाविरोधात जातांना याचबरोबर संजीवनी उद्योग समूहाचे मदतीने पद‌रमोड करून या परिसरासाठी शेती , उद्योग, पिण्यासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करून दिले.


तर दुसरीकडे सहकारी साखर कारखान्यांना ऊस उत्पादनात कायम घटीचा फटका सहन करावा लागतो. यामुळे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब सहकारी साखर कारखान्याला कार्यक्षेत्रा बाहेरचा तीनशे किलोमीटर अंतरावरील ऊस आणल्याशिवाय अन्य पर्याय उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत सतत सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब सहकारी साखर कारखाना तोट्यात जाण्याचे अनेक प्रस़गांला सामोरे जावे लागते. याचा अनुभव असल्याने कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब व संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा ध्यास घेऊन नवनवीन जोड उद्योग निर्मिती घडविली. उद्योगात वेळोवेळी भूतो न भविष्यती अशा तंत्रज्ञानाचा यशस्वी वापर केला. या परिसरात अशी एखादी नैसर्गिक मानवी वैयक्तिक आपत्ती नाही की संजीवनी उद्योग समूहाची मुक्तहस्ते मदत नाही. माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे वहिनी साहेब यांच्या मदतीने महिलांना बचत गटाच्या माध्यमातून कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला. उच्च शिक्षण व
व आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात संजीवनी उद्योग समूहाचा सिंहाचा वाटा आहे. कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब,बिपीनदादा कोल्हे यांच्या पावलावर पाऊल ठेवून विवेक कोल्हे यांनी कोरोना साथीवर स्वबळावर मात करुन संजीवनी उद्योग समूहाचे मदतीने मात केली. या जनहित कामगिरीने गेले 40 वर्षांपासून हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या खंडीत काळात आत्महत्या घडल्या असल्या तरीही आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत केली आहे याअभिनंदनीय जनसेवेची व साखर उद्योगाची डोळे दिपवून टाकणाऱ्या प्रगती किर्तीचा देशातील आसमंतात सुगंध दरवळला. यांची राज्य व देश पातळीवरील शंभराहून अधिक विविध स्तरांच्या नामवंत प्रतिभावान संस्थांनी दखल घेवून कर्मयोगी शंकरराव कोल्हे साहेब, बिपिन दादा कोल्हे, माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे वहिनी साहेब, विवेक कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब सहकारी साखर कारखान्यास प्रदान करुन गौरविले आहे. शुक्रवारी नवी दिल्लीस केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी व केंद्रीय शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन अध्यक्ष संजय अवस्थी यांचे शुभहस्ते शुगर टेक्नॉलॉजी असोसिएशन ऑफ इंडियाचे वतीने संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. ही कोपरगांव तालुक्यातील जनतेसाठी भुषणावह घटना आहे,
याबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे, माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे, सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब सहकारी साखर कारखाना अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांचे व त्यांच्या परिवाराचे त्रिवार अभिनंदन !!!
— जेष्ठ व्यापारी नारायण अग्रवाल कोपरगांव

जाहि

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे