महाराष्ट्र

कोपरगांव पिपल्स बँकेची ७७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न, डिजीटल बँकींगकडे वाटचाल चेअरमन सुनिल शांतीलालजी बंब

कोपरगांव पिपल्स बँकेची ७७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न, डिजीटल बँकींगकडे वाटचाल चेअरमन सुनिल शांतीलालजी बंब

कोपरगांव पिपल्स बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २८ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ४.०० वाजता अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली, सभेच्या अध्यक्षस्थानी विद्यमान चेअरमन सुनिल बंब हे होते. प्रारंभीक सभेची नोटीस असि. जनरल मॅनेजर जितेंद्र छाजेड यांनी वाचून दाखविली. विषय पत्रिकेवरील सर्व विषयांवर चर्चा करून खेळीमेळीच्या वातावरणात सर्व विषय मंजूर करण्यात आले. विविध विषयांच्या मंजुरीच्या वेळेत झालेल्या चर्चेत सभासद केशवराव भवर, प्रदीप नवले, देवेंद्र वानखेडकर, यांनी सहभाग घेतला. सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांना मा. चेअरमन सुनिल बंब व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक एकबोटे यांनी समर्पक उत्तरे दिली.
याप्रसंगी चेअरमन यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, बँकेची आर्थिक स्थिती अतिशय भक्कम ठेवलेली असुन, बँकेला ऑडीट वर्ग अ प्राप्त झालेला आहे. गुंतवणुक १५९ कोटी व ठेवी २८७ कोटी, कर्ज वाटप १६४ कोटी असुन निव्वळ नफा १ कोटी ७५ लाख इतका झालेला आहे. नेट एन.पी.ए. ०.०० टक्के ठेवण्यात बँकेला यश मिळालेले आहे.

बँकेची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे. परंतु यामध्ये सतत वाढ होण्यासाठी कर्जदारांना आर्थिक शिस्त लागणे महत्त्वाचे आहे, कर्जदारांना नियमित परत फेडीची सवय लावणे जसे महत्वाचे आहे तसेच आर्थिक नियोजनाचे महत्व देखील पटवून देणे महत्वाचे आहे. त्यासाठी बँकेने “Risk Base Marking” या पध्दतीने आधारीत व्याजदर आकारणी पध्दत सुरू केल्याने, कमी व्याजदर मिळवण्यासाठी कर्जदार आर्थिक शिस्त पाळू लागल्याचे सकारात्मक चित्र दिसत आहे.भविष्यात कॉरपोरेट बँकींग, पेपरलेस बँकींग, डीजीटल बँकींग, सुरू करण्याचा मानस मा. चेअरमन साहेबानी व्यक्त केला.बँकेचे आजी माजी संचालक, कर्मचारी व सभासद यांचे सहकार्यामुळेच बँकेने अमृत महोत्सवी वर्षात यशस्वी पदार्पण केलेले आहे त्याबद्दल त्यांनी आभार मानले.बँकेवर दाखविलेल्या विश्वासाबद्दल सभासद व ठेवीदारांचे आभार मानतांना व्यावसायिक स्पर्धेला सामोरे जाताना आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून आपल्या बँकेला अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अहमदनगर याचेकडून “BINGS AWARD आणि BITS AWARD असे दोन पारीतोषीक मिळालेले आहे.बँकेने मोबाईल बँकींग, गुगल पे, फोन पे, क्यु. आर कोड, ए.टी.एम या सारख्या सुविधा चालु केलेल्या आहेत.आगामी काळातील बँकींग व्यवसायाचा व सरकारी रोखेंमधील मार्केटचा चढउतार तसेच बँकेला आगामी काळात सभासदांना, ठेवीदारांना व कर्जदारांना इंटरनेट बँकींग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लागणाऱ्या इन्फ्रास्ट्रक्चर याचा विचार करता यावर्षी सभासदांना १०% प्रमाणे लाभांश देण्याचा ठराव समंत करण्यात आला आहे.या प्रसंगी सभासद खातेदार यांना आवाहन केले की, बँक देत असलेल्या सुविधेचा आपण जास्तीत जास्त लाभ घ्यावा व आपल्या बँकेच्या प्रगतीस हातभार लावुन संस्थेचे नाव उज्वल करावे.याप्रसंगी सभेस बँकेचे व्हा. चेअरमन सौ. त्रिशला गंगवाल व सर्व संचालक श्री. कैलासचंद ठोळे, रविंद्र लोहाडे, धरमकुमार बागरेचा, कल्पेश शहा, अतुल काले, राजेंद्र शिंगी, सत्येन मुंदडा, रविंद्र ठोळे, दिपक पांडे, सुनिल बोरा, अनिल कंगले, हेमंत बोरावके, वसंतराव आव्हाड, भाऊसाहेब लोहकरे संचालीका सौ. प्रतिभा शिलेदार, तज्ञ संचालक संजय भोकरे व्यवस्थापन मंडळ सदस्य संदीप रोहमारे, अभिमन्यु पिंपळवाडकर, निरज काले मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक एकबोटे हे उपस्थित होते. संचालक सत्येन मुंदडा यांनी सर्व उपस्थित सभासदांचे आभार मानले, नंतर सभेचे कामकाज संपल्याचे जाहीर केले. सुत्रसंचलन असि. जनरल मॅनेजर जितेंद्र छाजेड यांनी केले.

संपादक रवींद्र जगताप,कोपरगाव

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/IWdNrQEPOAw6LDkI6AkHAk

सत्य एक्सप्रेस youtbe chhanal पहाण्यासाठी खालील लिंक दाबा व चँनल सबस्क्राईब करा

https://www.youtube.com/@satyaexpressnews

धार्मिक ब्लाँग पहाण्यासाठी खालील लिंक दाबा

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे