सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ शालेय स्वयंपाकी व मदतनीस संघटनेची जामखेड तालुका कार्यकारिणी जाहीर
सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजदूर संघ शालेय स्वयंपाकी व मदतनीस संघटनेची जामखेड तालुका कार्यकारिणी जाहीर
संपादक:- रवींद्र जगताप
जामखेड प्रतिनिधी:- संपूर्ण भारतामध्ये आज रोजी सर्वात कमी मानधनावर काम करणारे शालेय पोषण आहार योजनेतील शालेय स्वयंपाकी व मदतनीस हे कामगार आहेत. दरमहा त्यांना फक्त अडीच हजार रुपये मानधन मिळते.अशा तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या असंघटित कामगारांची सम्यक फाउंडेशन प्रणित श्रमिक मजूर संघ शालेय स्वयंपाकी व मदतनीस विभाग ही संघटना असून तिची जामखेड तालुका कार्यकारणी आज जिल्हाध्यक्ष सविता विधाते यांनी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते, मान . शीतल दळवी राज्य समन्वयक , आश्विनी दळवी जिल्हा उपाध्यक्ष , राणी भोर जिल्हा कार्याध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर केले.

कार्यकारणी पुढील प्रमाणे अध्यक्ष – दत्तात्रय विठ्ठल क्षीरसागर ,सरचिटणीस – मनीषा अशोक बोराटे,कोषाध्यक्ष – रुपाली काळे उपाध्यक्ष – मुकुंद मुरलीधर सुतार , आशाबाई जगन्नाथ गव्हाणे,उषा बुवासाहेब भांडवळकर,संघटक म्हणून वैशाली पांडुरंग मुंडे,रंजना गोवर्धन चव्हाण प्रमिला देवकाते आदींची निवड करण्यात आली. समान काम समान वेतन यासाठी संघटनेची स्थापना झाली असून शालेय स्वयंपाकी व मदतनीस यांना किमान पंधरा हजार रुपये दरमहा मानधन मिळावे यासाठी आपण लढा देत आहोत असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते यांनी सांगून नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे अभिनंदन केले. राणी भोर यांनी सूत्रसंचालन केले तर अश्विनी दळवी यांनी आभार मानले. या प्रसंगी तालुक्यातील बहुसंख्य शालेय स्वयंपाक किंवा मदतीस कर्मचारी हजर होते.



