महाराष्ट्र

कोपरगाव जिल्हा करावा अशी मागणी विधानसभा अधिवेशनात करावी

कोपरगाव जिल्हा करावा अशी मागणी विधानसभा अधिवेशनात करावी

सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे

कोपरगाव जिल्हा करावा अशी मागणी विधानसभा अधिवेशनात करावी या आशयाचे निवेदन कोपरगाव चे आमदार आशुतोष काळे यांना जयहिंद विचार मंच संस्थापक अध्यक्ष किशोर चोरगे यांनी ईमेल ने दिले कोपरगाव आमदारांबरोबर सदर निवेदन हे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना हि माहितीसाठी प्रत पाठवली होती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या चार तासांत किशोर चोरगे यांच्या मागणीची दखल घेत पोहच पाठवली असुन निवेदनात पुढे म्हंटले आहे कि महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून स्वतंत्र कोपरगाव जिल्हा करावा अशी मागणी विधानसभेत लक्षवेधी मांडत करावी

कारण कोपरगाव हे समृध्दीच माहेरघर आहे कोपरगांव शहरातुन नैसर्गिक स्त्रोत महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी गोदावरी वाहते कोपरगाव तालुक्यात जगाला जोडणार आंतरराष्ट्रीय पातळीच विमानतळ आहे समृध्दी महामार्ग आहे कोपरगाव सहकाराचे जनक आहे समृध्द बाजारपेठ असणारे कोपरगावचा लौकिक वाढवणारे दोन सहकारी साखर कारखाने आहे जागतिक देवस्थान दैत्य गुरू शुक्राचार्य यांचे पदपावन स्थान आहे जगतगुरु जनार्दन स्वामी महाराज समाधी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी पदस्पर्शाने पावन स्थान तसेच जगाशी संपर्क करणारे सर्व सनसाधने कोपरगावात समृध्द आहे पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत आहे कोपरगाव वीटभट्टीच माहेर घर आहे असुन राज्यात कोपरगावातुन विटा सप्लाय होतात ज्या श्री विष्णूंनी श्रीराम प्रभुंचा अवतार घेतला त्या श्री विष्णूंच्या अस्तित्वाने पावन झालेली भुमी कोपरगाव आहे प्रभु श्री रामाच्या वडीलांचा दशक्रिया विधी कोपरगाव तालुक्यात झाला आहे श्रीराम प्रभु जन्माला यावे म्हणुन राजा दशरथांनी जो यज्ञ केला त्या यज्ञाला बसणारे ऋषी हे कोपरगाव तालुक्यात जन्मले आहे इतिहासातील देश प्रवर्तक ऐतिहासिक निर्णय कोपरगावातुन झाले आहे असे देशाच्या राजकारणात महत्वाची भुमिका बजावणार स्थान कोपरगाव आहे रघुनाथ दादा असो अथवा पवार सरकार यांच अस्तित्वाने संपन्न भुमी कोपरगाव आहे असा एक ना अनेक प्रकारे सर्वांगीण पध्दतीने कोपरगावात समृध्दी आहे म्हणुन कोपरगावचा इतिहास भुभाग जाणुन कोपरगावच जिल्हा झाला पाहिजे हि मागणी आपण विधानसभेच्या अधिवेशनात कोपरगाव जिल्हा व्हावा अस्या विनंती पर मागणी निवेदनाच्या अंती सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे यांनी पुनश्च केली आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे