राजकिय

समाज भूषण  दिपकराव गायकवाड  शिडीं लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणार

समाज भूषण  दिपकराव गायकवाड  शिडीं लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवणार

शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये बौध्द समाजाचे २,८०,००० मतदान असूनही बौद्ध समाजास सर्वच पक्षांनी डावलले

कोपरगाव वार्ताहर दि. २२ म. गांधी प्रदर्शन, कोपरगाव येथे उत्तर नगर जिल्ह्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सर्व गटातील नेते व कार्यकर्त्याची विशाल बैठक आज संपन्न झाली. शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये बौध्द समाजाचे २,८०,००० मतदान असूनही भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी बौध्द समाजास नेहमीच दुजाभाव केला व डावलले, नेहमीच गटबंधनाचा धर्म पाळूनही या पक्षांनी बौध्द समाजास या मतदार संघामधून निवडणूक लढविणेची संधी नाकारली.

पंधरा वर्षांपूर्वी मा. नामदार रामदासजी आठवले यांना काँग्रेस कडून उमेदवारी दिली, परंतु त्यावेळी अॅट्रॉसिटीचा खोटा मुद्दा उपस्थित करून मतदारांची दिशाभूल केली व नवखा उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे कडून दारूण पराभव घडविला. या पराभवाचा सल दलीत समाजाच्या मनातून गेली नाही. त्याचा वचपा काढण्यासाठी समाज भूषण अहमदनगर जिल्ह्याचा ढाण्या वाघ आयु. पंथर दिपकराव गायकवाड यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. दिपकराव गायकवाड सन १९७९ पासून दलित चळवळीत कार्यरत आहेत. त्यांच्या नावाची सुचना रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष यादवराव त्रिभुवन, राज्य सदस्य परशराम साबळे यांनी मांडली व तालुका अध्यक्ष विजयराव शिंगाडे यांनी अनुमोदन दिले.दिपकराव गायकवाड यांनी पँथर पासून शाखा अध्यक्ष या पदापासून नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या खांद्याला खांदा देवून संपूर्ण जिल्ह्यात गाव तेथे पँथरची शाखा काढून आज पँथर ते आरपीआय असा प्रवास करीत असतांना ग्रामपंचायत सदस्य पदापासून ते जिल्हा परिषद सदस्य पदापर्यन्त पदे भूषवून सर्व समाजाचे प्रश्न सोडविले. त्यांना समाजकार्य करीत असतांना समाज रत्न, राज्य शासनाचा समाज भूषण पुरस्कार मा. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे देणेत आला.तसेच संजय गांधी निराधार योजना, खादी ग्राम उद्योग व्हा. चेअरमन पदावर कार्यरत असून या माध्यमातून अनेक गोरगरीब समाजाची दिपकराव गायकवाड यांनी कामे केली व करीत आहेत. आज आपणास तुम्ही कोणतेही काम सांगा, त्यांच्यासाठी आमचे दिपकराव गायकवाड हे त्या समाजास न्याय देण्यासाठी हजर असतात.विजयराव शिंगाडे यांना सन १९७९ साली दिपकराव गायकवाड यांनी समाज कारणात आणले. दिपकराव गायकवाड यांचा मनमिळाऊ स्वभाव, कधीही कोणावरही न रागवणारा आपला माणूस म्हणून दिपकराव गायकवाड यांचे नाव घेतले जाते. कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथील एका गरीब कुटुंबात जन्मलेले दिपकराव गायकवाड यांना बालपणापासून समाज सेवेची आवड आहे. कोणत्याही समाजासाठी रात्रंदिवस काम करणारा नगर जिल्ह्यातील एक दलित नेता, समाज जागृती करणारा, मराठवाडा नामांतरासाठी तीन महिने जेल भोगणारा, तसेच कधीच स्वतःचा बडेजाव न करता आपला हक्काचा माणूस म्हणून दिपकराव गायकवाड यांना सर्व समाजाच्या वतीने प्रचंड बहुमताने निवडून देऊन खासदार म्हणून सेवेची संधी मिळावी असे आवाहन बैठकीमध्ये करण्यात आले.शिर्डी लोकसभा मतदार संघात मा. आयु. दिपकराव गायकवाड यांच्या उमेदवारीमुळे उत्तर नगर जिल्ह्यात नवचैतन्य निर्माण होऊन आपला माणूस आपल्यासाठी या संकल्पनेतून गोरगरीब समाजाचे प्रश्न हक्काने सोडविणारा हक्काचा जिल्ह्याचा वतनदार, मोठ्या मनाचा राजा माणूस, पँथरचा ढाण्या वाघ आयु. दिपकराव गायकवाड यांनी उमेदवारी करावी म्हणून एकमताने ठराव करण्यात आला.बैठकीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए.), रिपब्लिकन सेना, दलित पँथर चे नेते, कार्यकर्ते व असंख्य समाज बांधव पदाधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे