पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी. रक्तविर मित्र पुरस्काराने सन्मानित.
पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी.
रक्तविर मित्र पुरस्काराने सन्मानित.
संपादक:- रवींद्र जगताप
पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख तथा उत्तरनगर जिल्हा शिव आरोग्य सेना सचिव महेश कुलकर्णी यांच्या रक्तदान सेवेबद्दल जय महाराणा रक्तदान समुह भारत.मध्यप्रदेश खंडवा रक्तमित्र शैलु मंडलोई यांच्या संस्थेच्या वतीने रक्तविर मित्र व रक्तदान शिबीर. सेवा. गरजु रूग्णांना रक्त पुरवण्यासाठी तत्परतेने मदत करत असलेले समाजसेवकांची नोंद घेऊन 2018 पासुन संस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख तथा उत्तरनगर जिल्हा शिव आरोग्य सेना सचिव महेश कुलकर्णी यांच्या लक्षवेधी कार्याची दखल घेऊन त्यांना रक्तविर मित्र पुरस्कार जाहीर करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले कुलकर्णी यांना याआधी ही भारतातील अनेक सेवाभावी संस्थांन कडुन समाजभूषण पुरस्कार मिळालेले आहेत. आज त्यांना जय महाराणा रक्तदान समुह भारत यांचे वतीने सलग 2018 पासुन. 2023/2024 चा रक्तविर मित्र पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. रक्तविर मित्र पुरस्कार मिळाला बद्दल शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी यांचे शिवसेना .व शिव आरोग्य सेना महाराष्ट्र राज्यातील नेते.पदाधिकारी . कार्यकर्ते यांच्या सह पुणतांबा परीसरातुन पंचक्रोशीतील नागरिकांनी अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा देण्यात येत आहे.कुलकर्णी यांचे धार्मिक .शैक्षणिक .सामाजिक.क्रिडा.समाजातील गोरगरीब रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवेचा लाभ मिळण्यासाठी या कार्यात ते नेहमी तन मन धनाने सहभागी असता. ते शिवसेना उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे शिवसेना. पुणतांबा शहरप्रमुख तसेच शिव आरोग्य सेना उत्तरनगर जिल्हा सचिव पदावर काम करतात.

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा


