सामाजिक

कोपरगाव शहरात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आदर्श शिंदे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम

 

कोपरगाव शहरात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आदर्श शिंदे यांचा भीम गीतांचा कार्यक्रम

कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव शहरांमध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत असून समाज बांधवांच्या वतीने विविध कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यामध्ये विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या थाटामाटात साजरी केली जात असते कोपरगाव शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी रविवारी दिनांक 21 एप्रिल 2024 रोजी सायंकाळी पाच वाजता कर्मवीर शंकराव काळे मित्र मंडळ कोपरगाव यांच्या वतीने विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंती निमित्ताने महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांचा भीम गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष दादा काळे यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम होत आहे या कार्यक्रमासाठी कोपरगाव तालुक्यातील समाज बांधव यांच्यासह नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष  प्रकाश दुशिंग यांनी केले आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे