जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाचे विभाजन करुन, कोपरगाव येथे हे कार्यालय जनतेच्या सवेसाठी सुरु करा:-सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे
जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाचे विभाजन करुन, कोपरगाव येथे हे कार्यालय जनतेच्या सवेसाठी सुरु करा:-सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे
जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय यांचे विभाजन करुन . कोपरगाव येथे सदरचे कार्यालय करावे. यासाठी या विषयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले निवेदनात पुढे म्हंटले आहे कि जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय यांचे विभाजन होऊन कोपरगावला करावे तसेच अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे विभाजन करून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय शिर्डी येथे सुरू करण्यात आलेले आहे. तसेच सहाय्यक संचालक नगररचना अहमदनगर यांचेही विभाजन करून श्रीरामपूर येथे कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे. या दोन्ही कार्यालया मुळे उत्तर नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर संगमनेर कोपरगाव राहता नेवासा या तालुक्यांचे अंतर कमी झाल्यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैशाची बचत होणार आहे. फक्त एका शासकीय कार्यालयासाठी 100 किलोमीटर अंतर दूर जाणे नागरिकांना परवडत नाही. त्यामुळे जिल्हा अधीक्षक भूमी कार्यालयाचे विभाजन करून कोपरगाव येथे सुरू करण्यात यावे. त्याकरिता कोपरगाव तहसील कार्यालयाचा एक मजला रिकामा आहे. येईल सदर जागेचा उपयोग करून सदर कार्यालय कोपरगाव येथे होणे योग्य व गरजेचे आहे. त्यामुळे कोपरगावला ही सदर कार्यालय आल्यास न्याय मिळेल. कृपया जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयाचे विभाजन करून कोपरगाव येथे करावे अशी विनंती पर मागणी कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे यांनी केली आहे.




