सामाजिक

कोपरगांव तालुक्यातील अपात्र ड यादीतील घरकुल लाभार्थ्यांचे फेर सर्वेक्षण करून नियमाकुल करावे-स्नेहलता कोल्हे.

कोपरगाव ड यादीतील घरकुल लाभार्थ्यां फेर सर्वेक्षण करून त्यांचा पात्र घरकुलात समावेश करावा या आशयाचे निवेदन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले
कोपरगांव तालुक्यातील अपात्र ड यादीतील घरकुल लाभार्थ्यांचे फेर सर्वेक्षण करून नियमाकुल करावे-स्नेहलता कोल्हे.
कोपरगांव:-घरकुल हे प्रत्येकाचे स्वप्न असुन त्याच्या परिपुर्तीसाठी तो सातत्याने झटत असत कोपरगांव तालुक्यातील १९ हजार लाभार्थ्यांचे घरकुलांचे सर्व्हेक्षण करण्यात आले त्यात सिस्टीम रिजेक्टेडच्या नावाखाली ५ हजार प्रस्ताव नामंजुर करण्यात आले उर्वरित १४ हजार प्रस्ताव हे गटविकास अधिका-याच्या अधिपत्याखालील समिती कडे पात्र अपात्रतेसाठी देण्यांत आलेले आहेत तेव्हा हे ५ हजार ड यादीतील घरकुल लाभार्थ्यां फेर सर्वेक्षण करून त्यांचा पात्र घरकुलात समावेश करावा या आशयाचे निवेदन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना दिले असुन, चालु अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न उचलून धरावा अशी विनंतीही त्यांनी केली आहे. सौ. स्नेहलता कोल्हे यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,कोपरगांव तालुक्यात अंदाजे १९ हजार घरकुलांची यादी कोपरगांव पंचायत समितीकडे आसुन त्यापैकी ५ हजार घरकुले ही शासकिय निकष लावुन वगळण्यात आली आहे. उर्वरीत १४ हजार घरकुल यादीचे पात्र अपात्रतेचे काम पंचायत समितीने नेमलेल्या सर्वेक्षण कमिटीने नुकतेच केलेले आहे. त्यामध्ये घरकुल लाभार्थ्यांना मोठ्याप्रमाणात ‘ड’ यादीतुन अपात्र ठरविण्यात आलेले आहे व त्याचे निकष देखील अत्यंत किचकट असल्याने ज्यांना खरोखर निवाऱ्याची गरज आहे त्यांना घरकुला पासुन वंचित ठेवले जात आहे ही बाब यामध्ये प्रकर्षाने जाणवते. तेंव्हा शासकिय निकष शिथील करून सर्व घरकुल यादी मंजुर व्हावी यासाठी फेर सर्वेक्षण होणे अत्यंत गरजेचे आहे.  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दूरदृष्टीकोनातुन गरजु लाभार्थ्यांना हक्काचा निवारा व्हावा व त्यांच्या घरकुलाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा म्हणुन सर्वांसाठी घरे यासाठी प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल ‘ड’ यादीचे फेर सर्वेक्षण होवुन त्यांना न्याय मिळावा व सर्वच घरकुल लाभार्थ्याचा ‘ड’ यादीत समावेश होणेसाठी संबंधित विभागास आदेश व्हावेत अशी मागणी सौ स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे