_”सुनेत्राताई पवारांवरील आक्षेपार्ह वक्तव्याचा कोपरगाव शिवसेना महिला आघाडीने केला निषेध”_

_“सुनेत्राताई पवारांवरील आक्षेपार्ह वक्तव्याचा कोपरगाव शिवसेना महिला आघाडीने केला निषेध”_
कोपरगाव प्रतिनिधी :-महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सौ. सुनेत्राताई पवार यांच्याविषयी करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा कोपरगाव तालुका महिला आघाडी शिवसेनेच्या वतीने शिवसेना महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख सौ. मीनाक्षीताई वाकचौरे यांनी तीव्र निषेध नोंदविला आहे.महाराष्ट्र राज्य हे छत्रपती शिवरायांचे राज्य आहे, साधुसंतांचा महाराष्ट्र आहे हिंदुरुदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र आहे धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांचा महाराष्ट्र आहे महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री व लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ एकनाथजी शिंदे साहेब यांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही महिलेचा अवमान होणार नाही ती महिला पदाधिकारी असो वा सर्वसामान्य समाजातील असो वा कोणत्याही पक्षातील असो, तिच्याविषयी अपमानास्पद भाषा वापरणे ही महाराष्ट्राच्या सुसंस्कृतीला परंपरेला काळिमा फासणारी बाब आहे. राजकारण हे विचारांचे असते; मात्र महिलांचा सन्मान हा आपल्या वरील संस्कारांचा, संस्कृतीचा आणि स्वाभिमानाचा भाग असतो

महिलांचा स्वाभिमान, सुरक्षितता आणि सन्मान जपण्यासाठी शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब नेहमीच ठामपणे उभे राहिले आहेत, याचा आम्हाला महिला भगिनींना सार्थ अभिमान आहे . यापुढे कोणत्याही महिला नेत्या किंवा सर्वसामान्य महिलांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी , अशी आमची ठाम मागणी आहे.

सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांनी महिलांविषयी आदराची भूमिका कायम ठेवावी. राजकारण मतांचे असते, पण महिलांचा सन्मान हा आपल्या संस्कृतीची शिकवण आहे मर्दानगीचे पुरावे महिलांचा अपमान करून नव्हे, तर त्यांचा सन्मान करूनच दिले जातात.महिलांचा आदर करणाऱ्यांचा आम्ही आदर करू; मात्र महिलांचा अपमान करणाऱ्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय शिवसेना महिला आघाडी कधीही मागे राहणार नाही. महिला वरील आक्षेपार्ह वक्तव्याचा किंवा अन्या अत्याचाराचा बदला शिवसेना महिला आघाडी शिवसेनेच्या स्टाईलनेच उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही असे सौ. मीनाक्षीताई वाकचौरेशिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख कोपरगाव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.



