महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आक्षेपार्य पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आक्षेपार्य पोस्ट करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा

देशभरात जातीयवाद मोठ्या प्रमाणात वाढत असुन .काही वर्षानंतर भारतात,अफगाणिस्तान, पाकिस्तान सारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही.शासनाने प्रशासनाने ,विशेषतः गृहखात्याने याकडे लक्ष दिले पाहिजे,  नुकतेच इंस्टाग्राम वर एका तरुणाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आक्षेपार्य पोस्ट टाकली आहे त्याचबरोबर मुस्लिम बांधवांविषयी आक्षेपार्य लिखाण करून धार्मिक भावना दुखावल्या आहे. काल एका मनुवादी प्रवृत्तीच्या इसमाने विश्व वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी गलीच्छ व निंदनीय असे शब्द वापरुन तमाम सकल आंबेडकरी समाजाच्या भावना दुखवून समाजात तेड निर्माण करण्याचा प्रयत्न केला तसेच मुस्लीम समाजाबद्दल सुध्दा धर्माला उद्देशून गलिच्छ व खालच्या पातळीला जावून त्याने आपल्या मोबाईलवरुन एक्स साहील्या ००७ ही इष्टाग्रामवरची आयडीरुन तमाम मुस्लीम समाजाच्या सुध्दा भावना दुखावल्या आहे.या घटनेचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तिव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला आहे या इसमाचा शोध घेवून त्वरीत त्यावर गुन्हा दाखल करून अटक करावी व योग्य ते शासन करावे अन्यथा आम्ही संविधानीक मार्गाने कोपरगांव शहरात व तालुक्यात जिल्हयात तिव्र स्वरुपाचे आंदोलन छेडू असे निवेदन वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष नितीनराव बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुका महासचिव गौतम बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली वरील निवेदन कोपरगाव पोलिस स्टेशनला देण्यात आले आहे. या निवेदनावर तालुकाअध्यक्ष नितिन बनसोडे,तालुका महासचिव गौतमराव बनसोडे शहराध्यक्ष शुभम शिंदे , आरिफ पटेल अन्वर पठाण गोऱ्या दादा चोपदार फिरोज पठाण ,युसुफ पठाण ,अक्षय पवार, अमजद शेख अभिजीत साठे, रवी भालेराव तनवीर शेख, निसार पठाण मुशरफ शेख आदि नागरिकांच्या यावर सह्या आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे