महाराष्ट्र

जगण्यासाठी राबत झटत जिवन संघर्ष करत असतांना आता महिला एकतेची ताकत दाखवण्याची वेळ आली आहे:- सौ.सोनल चोरगे (लोणारी) सामाजिक कार्यकर्त्या

जगण्यासाठी राबत झटत जिवन संघर्ष करत असतांना आता महिला एकतेची ताकत दाखवण्याची वेळ आली आहे:- सौ.सोनल चोरगे (लोणारी) सामाजिक कार्यकर्त्या

भारत स्वातंत्र्य झाल्यावर (१९५२) ज्या लोकसभा निवडणूक झाल्या त्या (२०१९) पर्यंत कोपरगाव लोकसभा मतदारसंघाची दोनदा पुर्नररचना झाली पहिले जो कोपरगाव लोकसभा मतदार संघ होता तो नंतर शिर्डी मतदारसंघ झाला कोपरगाव /शिर्डी लोकसभा मतदार संघातुन सतरा लोकसभा निवडणुकीत महिलांना नेतृत्व करायची संधी मिळाली नाही पण १८ व्या लोकसभा निवडणुकीत एक महिला नेतृत्व करायला उभी राहिली त्या महिलेला एकदा लोकसभेत जाण्याची संधी मिळाली पाहिजे

असे जनमत आहे महिला आरक्षण मिळाले पण आपल्या लोकसभा मतदारसंघातुन महिलेला संधी कधी मिळाली नाही हि शोकांतिका आहे पक्ष कोणताहि असो याशी देणंघेणं न ठेवता यावेळेस एका महिलेला कोपरगाव/शिर्डी लोकसभेतुन निवडुन देत
महिला सक्षमीकरण प्रत्येक्षात उतरवत माता सावित्रीबाई फुलेंना हे अभिवादन ठरेल कोपरगाव/शिर्डी लोकसभा मतदार संघाने या संधीच सोन करत महिलांनी मोठ्या संख्येने मतदानाला बाहेर निघत महिला शक्तीची जाणीव करून देण्याची गरज आहे
यावेळी (कोपरगाव)शिर्डी लोकसभा मतदारसंघातुन महिलेला लोकसभेत नेतृत्वाची संधी मिळण गरजेचं आहे आणि ते करता यावं म्हणुन माता सावित्रींच्या लेकींनी घराबाहेर पडत महिला आधी शक्तीची ताकत दाखवण्याची गरज आहे विषमता आणि विसंगतीने हा समाज भरला असला तरी झिजत राबत झटत आता महिला एकतेची ताकत दाखवण्याची वेळ आली आहे
जय नारी शक्ती
जयहिंद

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे