कृषीवार्ता

हरिसन ब्रँच परीसरातील लाभार्थी शेतकरी आवर्तनाच्या प्रतीक्षेत !!- संचालक मधुकर वक्ते

हरिसन ब्रँच परीसरातील लाभार्थी शेतकरी आवर्तनाच्या प्रतीक्षेत !!- संचालक मधुकर वक्ते

जेऊर कुंभारी :-गोदावरी उजव्या कालव्यातून आवर्तन सुटून पंधरा दिवस उलटून गेले तरीही हरीसन ब्रँचचारी ला अद्याप पाणी नाही आवर्तन सुटल्यानंतर चितळीला पाणी पोहोचल्यानंतर हरिसन ब्रँचचारी ला तिसऱ्या दिवशी पाणी दिले जाते परंतु पाणी वेळेवर न दिल्यामुळे शेतकरी वर्गात मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त झाली आहे.
पाटबंधारे विभागाच्या ढिसाळ नियोजनाचा शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
हरिसन ब्रँचचारीने चांदेकसारे ,डाऊच खुर्द या भागातील शेतकऱ्यांना पाणी मिळत असते विहिरींनी तळ गाठले आहे जनावरांना पिण्यासाठी पाणी सुद्धा राहिले नाही. उन्हाचा तडाखा वाढला असुन जनावरांच्या चाऱ्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.पूर्वी आर्वतन वेळेवर आल्याने या भागांमध्ये उसाची पिके मोठ्या प्रमाणात घेतली जात असे त्यामुळेच या भागात हरित क्रांतीचा उदय झाला,माजी मंत्री शंकरराव जी कोल्हे साहेब या भागाला कॅलिफोर्निया संबोधत असे.

पण आता परिस्थिती बदलली आहे पाटबंधाऱ्याच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी वेळेवर न सोडल्यामुळे या भागामध्ये शेतकऱ्यांना शेती करावी की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे आवर्तन सुटल्यानंतर कायमच जेऊर कुंभारी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना पोटबंधारे विभागाच्या ऑफिसला जाऊन पाण्यासाठी भांडावे लागत आहे असे जर कायमस्वरूपी चालले तर मोठ्या प्रमाणात जन आंदोलन छेडले जाईल असा इशारा महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक मधुकर वक्ते यांनी दिला.

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे