राजकिय

महाराष्ट्रात भाजपाने एकला चलो भूमिका घेऊन विधानसभा निवडणूक लढविली तरी सर्वसामान्य मतदार व भाजपाचे  कार्यकर्ते निवडणुकीत १००% यशच मिळवून देतील:- मा.नगराध्यक्ष विजय वहाडणे

महाराष्ट्रात भाजपाने एकला चलो भूमिका घेऊन विधानसभा निवडणूक लढविली तरी सर्वसामान्य मतदार व भाजपाचे  कार्यकर्ते निवडणुकीत १००% यशच मिळवून देतील:- मा.नगराध्यक्ष विजय वहाडणे

पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन श्री.देवेन्द्रजी फडणवीस यांनी राजीनामा द्यायची गरजच नाही.

संपादक :- रवींद्र जगताप

लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात भाजपाला मोठ्या प्रमाणांत नुकसान सोसावे लागले.महाराष्ट्रातील मतदार व भाजपा आणि रा.स्व.संघ कार्यकर्त्यांच्या
प्रतिक्रिया लक्षात घेता ,यानंतर महाराष्ट्रात तरी भाजपाने एकला चलो भूमिका घ्यायला हरकत नाही.कारण भाजपाने इतर पक्षांशी केलेली महायुती अनेक एकनिष्ठ-जेष्ठ कार्यकर्त्यांना मान्यच नव्हती.त्यामुळेच अनेक जेष्ठ-अनुभवी कार्यकर्ते प्रचारांत सक्रिय होते.पण मनापासून प्रचार करणे व बळेबळेच प्रचारात सहभाग घेणे यात फार मोठे अंतर आहे

जाहिरात

आयुष्यभर एका विचाराला धरून,विपरीत परिस्थितीतही न डगमगता निःस्वार्थपणे राष्ट्र व धर्म यासाठी भाजपात कार्यरत राहणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये तडजोडीच्या राजकारणामुळे आलेली हतबलता-शिथिलता-नैराश्य हानिकारकच आहे.भाजपाचे देशात फक्त दोनच खासदार असतानाही कार्यकर्ते कधीही पक्षापासून- विचारांपासून दूर गेले नाहीत.

जाहिरात

पंतप्रधान नरेंद्रजी मोदींसारखे निष्कलंक-निःस्वार्थ नेते असतांना महाराष्ट्रात भाजपाने एकला चलो भूमिका घेऊन विधानसभा निवडणूक लढविली तरी सर्वसामान्य मतदार व भाजपाचे १००% कार्यकर्ते
निवडणुकीत यशच मिळवून देतील यात शंकाच नाही.जनतेला महायुती-महाआघाडी मान्यच नसल्याने मतांची टक्केवारीही घसरत चालली आहे.पराभवाची नैतिक जबाबदारी घेऊन श्री.देवेन्द्रजी फडणवीस यांनी राजीनामा द्यायची गरजच नाही.खरे तर महाराष्ट्रातील भाजपाच्या ज्या माजी आमदार-माजी मंत्री-पदाधिकारी यांनी लोकसभा निवडणुक प्रचार कार्यात सहभाग घेतला नाही-टाळाटाळ केली-पक्ष श्रेष्ठींना विनवण्या करायला भाग पाडले-अपेक्षित मताधिक्य दिले नाही अशांवर पक्षाने कठोर कारवाया केल्या पाहिजेत.तरच मतदार व कार्यकर्त्यांत चांगला संदेश जाऊन आगामी निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळेल.जर बहुमत मिळालेच नाही तर 5 वर्षे प्रभावी विरोधक म्हणून जनतेत जाऊन काम करावे.जनता भाजपाला स्वीकारल्याशिवाय राहणार नाही.निवडणूकपूर्व युती करून जागा वाटप केले तर मित्रपक्षांच्या वाट्याला गेलेल्या जागांवरील भाजपाच्या कर्तृत्ववान-उमेदीच्या कार्यकर्ते-नेत्यांनी आयुष्यभर सतरंज्याच उचलायच्या का? हाच सवाल बहुतांश भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात आहे.पक्षशिस्त म्हणून कुणीही बोलत नसल्यानेच पक्षश्रेष्ठींपर्यंत या भावना पोहोचतच नाहीत.अनैसर्गिक युत्या व आघाड्या म्हणजे एकप्रकारे अनैतिक संबंधच आहेत हीच भावना सर्वदूर आहे हे नक्की.निवडणूकपुर्व युती नकोच पण अपरिहार्यताच असेल तर निवडणुकीनंतरही काही निर्णय घेता येतील.असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात मा.नगराध्यक्ष विजय वहाडणे म्हणाले आहे.




सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/KgmXrffhj0F6D04zF6eSoo

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे