गुन्हेगारी
कोपरगाव शहरात कत्तलीच्या उद्देशाने आणलेल्या सहा गोवंश जनावरांची सुटका
कोपरगाव शहरात कत्तलीच्या उद्देशाने आणलेल्या सहा गोवंश जनावरांची सुटका
संपादक:- रवींद्र जगताप
कोपरगाव शहरातील आयशा नगर खंदक नाला परिसरात काटवणात गोवंश जातीचे जनावरे कत्तलीच्या उद्देशाने व त्यांना त्रास होईल या उद्देशाने बांधून ठेवले व पत्र्याच्या शेडमध्ये धारदार शस्त्राने त्यांचे कत्तल केल्याचे आढळून आले आहे या ठिकाणी पोलिसांनी धडक कारवाई करत या जनावरांची सुटका केली आहे यात संशयित आरोपी शकील बागवान राहणार सुभाष नगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रसंगी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे या कारवाईत ०४ गाई व ०१ कारवड ०१ गोरा त्याचबरोबर ५०० किलो गोमांस असा एक लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे

