सामाजिक

अप्पासाहेब मकासरे यांच्या पुढाकाराने निराधार महिलेला आधार

अप्पासाहेब मकासरे यांच्या पुढाकाराने निराधार महिलेला आधार

आपल्यानी टाकुन दिले माणुसकीने सांभाळले

राहुरी प्रतिनिधी – राहुरी बस स्थानकात मागील तीन महिन्यांपासून कोपरगाव येथील काळे नामक महिला बेवारसपणे राहत होती बस स्थानकात जे देतील ते खाणे व त्या वरच दिवस भर उपाशी पोटी उघड्यावर झोपणे अशी दैनिय अवस्थेत होती या महिलेची माहिती सामाजिक कार्यकर्ते अप्पासाहेब मकासरे यांना समजता त्यांनी त्या महिलेची आपुलकीने चौकशी करून त्यांना आधार देत त्यांचे सहकारी कुपा आश्रम चे संचालिका रोहीणी सॅकमन व्यवस्थापक किरण गायकवाड यांच्या सोबत संपर्क करुन वृद्ध महिला काळे यांना कुपा आश्रमात सहभागी केले या वेळी वृद्ध महिला काळे यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आपल्यानी टाकुन दिले माणुसकीने सांभाळले चे भाव चेहऱ्यावर दिसले या वेळी आप्पासाहेब मकासरे यांच्या समवेत कुपा आश्रम चे व्यवस्थापक किरण गायकवाड रॉबर्ट सॅम्युएल बस स्थानक नियंत्रक बागुल शोएब जहागिरदार शहाबाज कुरैशी आदी उपस्थित होते सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असणारे आप्पासाहेब मकासरे व त्यांच्या सहकाऱ्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे