महाराष्ट्र

आम्हाला शहाणापणा शिकू…

आम्हाला शहाणापणा शिकू…
समाजप्रबोधन पर लेख

समाजामध्ये सर्वसामान्य माणसाने कोणत्याही गोष्टीचा जास्त अतिरेक केला किंवा गवगवा केला की त्याला फार शहाणा झाला असे म्हणतात. प्रत्येक माणसाकडे कोणता ना कोणता गुण असतोच; तो कोणाच्या तरी मोहपाशात पडतो, लवकर त्याला कळत नाही. नंतर तो मोह मत्सर, राग ,द्वेष, यामध्ये गुरफटून जातो.नंतर नंतर तो शहाणा होण्याचा प्रयत्न करतो. परंतु ते ज्ञान त्यांना अर्धवटच मिळते, आणि मग ते इतरांना शहाणपण शिकवायला जातो. तेथे समाज म्हणतो ‘आम्हाला शहाणपणा शिकवू नकोस? तुझं तू बघ, परंतु स्वतः ज्ञानी नसल्यामुळे त्यांचे अर्ध ज्ञान उघडे पडते म्हणून त्यांना अनेक जण अतिशहाणा ,फार शहाणा असे संबोधतात. किंवा त्याला दीड शहाणा म्हणून उपहास करतात. माणसाला प्रत्येक गोष्टीमध्ये संयम असावा लागतो

जाहिरात

त्यामुळे आपले मन काबूत राहते आपल्या मनावर अटकाव करता येतो. तोंड सांभाळून राहणे अतिशय चांगले नाही तर समाज लगेच शहाणा झाला, शहाणपण आले, अति शहाणा झाला. असे मुक्ताफळे आपल्या नावावर उधळतात.दोन वर्षाखाली तर हा साधा सरळ होता.एवढी बुद्धी आली कुठून? मन मानेल तसं तो वागत आहे. आता त्याच्या हातात पैसा आला आहे.किंवा त्याच्या कडे आता काही राहिलं नाही? त्यांनी मर्यादा ओलांडल्या? अशा पद्धतीचे बोल बोलून माणसाला दीड शहाण्याची उपाधी देतात. म्हणून समाजामध्ये वागते वेळेस सर्वांबरोबर व्यवस्थित वर्तन करावे, सर्वांच्या सोबत राहावे, जीवन व्यवस्थापन, सुख समाधान या गोष्टी स्वतःच कराव्यात. आपण कार्य करीत राहिलो, की आपल्याला मान मिळतो. कोणाच्याही घरात जाऊन बसण्याची गरज नाही. जर आपण चुकीचे वागलो तर लगेच लोक आपल्याला नाव ठेवायला सुरू करतात. शहाणपणा हा वयावर अवलंबून नसून कर्तुत्वावर तो अवलंबून आहे ,शहाणपण हा शब्द सज्ञान, सुज्ञपणा, ज्ञानी अशा लोकांना वापरला जातो, परंतु त्यातच व्यवहारांमध्ये थोडा माणूस चुकला की त्याला मूर्ख,अज्ञानी म्हणून त्याची टिंगल टवाळी केली जाते. म्हणून नेहमी आपण बोलणारा शब्द विचारपूर्वक तोलून बोलावा.नाहीतर इतिहासामध्ये साडेतीन शहाणे होते तसे आपली कीर्तीबरोबर अपकीर्ती सुद्धा बाहेर येते. पेशवाईच्या काळामध्ये हे साडेतीन शहाणे होऊन गेले, त्यामध्ये (1)विठ्ठल सुंदर- 1763 (2 )देवाजीपंत चोरघडे -1781 (3) सखाराम बोकील- 1781 हे तीन जण पूर्ण शहाणे होते. परंतु अर्धा शहाणा म्हणून समाजामध्ये आणि इतिहासा मध्ये प्रसिद्ध असलेले नाना फडणवीस सन अठराशे मध्ये होऊन गेले, कारण ते तलवारबाजी मध्ये तरबेज नव्हते म्हणून त्यांना त्या काळात अर्धा शहाणा ही उपाधी देण्यात आली
.बारभाईचे कारस्थान ज्या काळात रचले गेले त्याच काळात या घटना घडल्या म्हणून प्रत्येकाने शहाण्या सारखे वागावे.
‘शिकून शहाणे व्हावे’ शिकणे ही आपली प्रक्रिया चालूच ठेवावी. आपण शिकत गेलो की शहाणे होतो .ज्ञानी होतो म्हणून आपले ज्ञान नेहमी अथांग सागरा सारखे असावे. नाही तर विहिरीत पाणी नाही तर पोहऱ्यात कुठून येणारच नाही. हे त्रिकाल सत्य आहे. सध्या डिजिटल युग आहे. आज काल कोणीच कोणाला मानत नाही. आपल्याला सर्व काही येते या भ्रमात बरेच जण आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर नको ते उद्योग सध्या सुरू आहेत. कॅम्पुटर ,टीव्ही, मोबाईल याचा वापराचा अतिरेक करून अति शहाणपणा दाखवत आहेत. हा शहाणपणा आता बऱ्याच जणांच्या जीवघेणा ठरला आहे.रील्सने तर सध्या हैदोस मांडलेला आहे. बेगडी आकर्षणे,अकारण लुबाडणूक, फसवणूक,प्रेमभंग, विनयभंग, लुटालूट, बलात्कार, अपहरण,अशी अनेक संंकटे या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात पसरलेले आहेत.कोण कोणाचा शहाणपणा कधी काढून घेईल हे सांगता येत नाही. आपण विकसित झालो आहोत असे प्रत्येकाला वाटत आहे ,हा गोड गैरसमज आहे. आपल्याकडे ज्ञान असावे तर ते विधायक असावे. स्फोटक व विद्रोही असू नये. विनाशकारी असू नये. सध्याला लोक शहाणपणाच्या नावाखाली वेगवेगळे कारण सांगून फसवत आहेत. *सुरी सोन्याची झाली म्हणून ती पोटात किंवा उरात खुपसून घेता येत नाही* याचा अर्थ असा जास्त शहाणपणा झाला म्हणून नको त्या गोष्टी करता येत नाहीत
,दुसऱ्या महायुद्धात जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर या नाविक तळावर अणुबॉम्ब टाकले, तेव्हा जपानला वाटले आपण जिंकलो, परंतु अमेरिकेने ६ ऑगस्टला हिरोशिमा आणि ९ ऑगस्टला नागासाकी या दोन शहरावर अणुबॉम्ब टाकून जपानच्या चिंधड्या उडवल्या, तेव्हा जपान शांत झाला.मानवी जीवन हे अनमोल आहे. तुम्ही एखाद्या गोष्टीचा उपभोग घ्या परंतु त्या ठिकाणी तेथील परिस्थिती पहा. आपण सध्याला कुठे आहोत हे सुज्ञपणाने विचार करा. कोंबडी अंडी देते,तर रोज एक एक खा याला शहाणपणा म्हणतात. परंतु एकाच दिवशी कोंबडी कापून खाऊ नका.याला अतिशहाणापणा असे म्हणतात. म्हणून निसर्गाने मानवाला दिलेली जी बुद्धी आहे. तिचा विनियोग चांगलाच करा. जबाबदारीने वागावे, कोणत्याही गोष्टीचा अतितायीपणा करू नये. अगोदर ती समजून घ्यावी, नंतरच निर्णय घ्यावा. आईवडिलांचा,गुरुचा नेहमी सन्मान करावा, हिटलरने अति शहाणपणा केला आणि शेवटी बर्लिन शत्रूच्या ताब्यात गेले की स्वतः आत्महत्या करून जीवन संपवले.म्हणून शहाणपणा असावा परंतु अति शहाणपणा नसावा हा एक महत्त्वाचा संदेश या ठिकाणी देत आहोत. सध्याची तरुण पिढी वाचन लेखन करीत नाही.असं सर्वत्र बोलले जात आहे. छोट्या-मोठ्या गोष्टीवरून वादविवाद निर्माण करतात. ऐकत नाहीत? यामुळे घरात नेहमी तंटे आणि मतभेद होतात. महापूर आल्यास पाण्या मध्ये जाण्याचा शहाणपणा करू नये? केला तर तो अंगलट येतो.यासाठी सर्वांनीच एकमेकाला समजून घेऊन वागावे.शहाण्यासारखं राहावे, शहाणपणा करू नये

शब्दांकन
*प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत अध्यक्ष :विठूमाऊली प्रतिष्ठान* *खैरकावाडी ता.मुखेड जि. नांदेड*

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे