महाराष्ट्र

प्रभाग क्र. ७ मधील वासिम खाटीक घर ते शकील शेख घर मंजूर झालेला कॉक्रीटीकरण रस्ता तत्काळ सुरू करा:-.आर पी आय ची मागणी

प्रभाग क्र. ७ मधील वासिम खाटीक घर ते शकील शेख घर मंजूर झालेला कॉक्रीटीकरण रस्ता तत्काळ सुरू करा:-.आर पी आय ची मागणी

कोपरगाव:- प्रभाग क्र.७ मधील गेली अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला वसीम खाटीक घर ते शकील शेख घर रस्त्याचा असणारा प्रश्न मंजुरी असूनही मार्गी लागताना दिसून येत नाही. परंतु सदर भागातील नागरिकांच्या वेळोवेळी निवेदन देऊन नगरपरिषदेने दखल घेऊन २४ जुलै रोजी या रस्त्याची निविदा काढून कामाला सुरुवात होत नसल्याने आर पी आय आठवले पक्षाच्या वतीने कोपारगांव नगर पालीकेला निवेदन देत येत्या दोन दिवसात रस्त्याचे काम सुरु करण्याची मागणी केली आहे.

जाहिरात

निवेदनात म्हटले आहे की मजबुतीकरणा च्या नावाखाली नागरिकांच्या समाधाना पोटी सदर रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी मुरूम टाकण्या ऐवजी कुठली तरी माती उचलून आणून टाकुन सदर भागातील नागरिकांची फसवणूक करण्याचं काम याठिकाणी नगरपालिका कडून चालू आहे, ही गोष्ट लक्षात येताच काही सुज्ञ नागरिकांनी पुढाकार घेऊन मातीचे डंपर बंद केले. तसेच माती टाकल्या मुळे रस्त्याची जास्तच दुरवस्था झाल्याने नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागल्याने पुन्हा नागरिकांनी स्वखर्चानी जेसीबी बोलावून माती हटवन्याचे काम करण्यात आले आहे, परंतु त्याचा काही एक फायदा झालेला नाही. पुन्हा जैसे थे परिस्थिती रस्त्याची आणखी जास्त दुरावस्था झालेली असून नागरिकांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे.नागरिकांना घरातून बाहेर निघणे ही अवघड झाले असून चार ते पाच अपघात आलेले आहे, सुदैवाने त्यांना गंभीर दुखापत झालेली नाही, परंतु सध्या पावसाळ्याचे दीवस सुरु असल्याने आणखी मोठा गंभीर स्वरूपाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. सदर ठिकाणी यापुढे जर गंभीर अपघात झाला व कुठल्याही नागरिकाला आपला जीव गमवावा लागला तर या घटनेला नगरपालिका प्रशासन पूर्णपणे जबाबदार राहील.नगर पालिकेनी सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, येणाऱ्या दोन दिवसात दखल घेऊन रस्त्याचे काम सुरू केले नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने मुख्याधिकारी साहेबांच्या ऑफिस बाहेर गाळ, चिखल सोबत घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल तसेच होणाऱ्या परिनामास व परिस्थितीस नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील या वेळी महाराष्ट्र राज्य सचिव दिपकराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली
तालुकाध्यक्ष.अनिल रणनवरेशहराध्यक्ष.सोमनाथ लोहकरे यांच्या नेतृत्वाखाली .तालुका उपाध्यक्ष : किशोर मैन्द , अकिलभाई शेख पप्पुभाई सैय्यद ,मुख़्तार शाह,जूबेर शेख , वसीम खाटीक ,शकील शेख , राहुल भिवसणे , अमोल थोरात,आदी कार्यकर्ते उपस्थित होते .

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे