ब्रेकिंग

कोपरगाव तालुक्यात चासनळी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरा

कोपरगाव तालुक्यात चासनळी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरा

 कोपरगाव:- :- १ ऑगस्ट रोजी लोकशाहीर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांचा जयंती उत्सव संपूर्ण महाराष्ट्र मध्ये ठिकठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा झाला याच अनुषंगाने कोपरगाव तालुक्यामध्ये डॉक्टर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फाउंडेशन, बहुजन टायगर फोर्स पदाधिकारी , सर्व मातंग समाज बांधव तसेच चासनळी गावातील सर्व जाती धर्मातील समाज बांधव यांनी एकत्र येत अण्णाभाऊ साठे यांना हार पुष्पहार अर्पण करत जयंती उत्सव गुन्या गोविंदाने साजरा केला,

जाहिरात

याप्रसंगी एकलव्य आदिवासी परिषदेचे संस्थापक अध्यक्ष माननीय मंगेश भाऊ औताडे हे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते तर सरपंच बनसोडे, उपसरपंच चांदगुडे, संचालक सचिन चांदगुडे, कैलास माळी, ज्ञानेश्वर धेनक , बहुजन टायगर फोर्स चे बहुजन टायगर फोर्स चे अध्यक्ष अविनाश कांबळे, जिल्हा संघटक सागर गांगुर्डे, साईनाथ साळवे ,शुभम गायकवाड प्रकाश कांबळे, सतीश आव्हाड,गणेश साठे
प्रसाद वाकळे,आकाश वाकळे, ओंकार कांबळे,करण कांबळे अनिकेत भाऊ कांबळे,साईनाथ साळवे,शिवनाथ कांबळे,गोरख साळवे अश्विन साळवे,नवनाथ उल्लारे फकीरा गायकवाड,देविदास तूपसुंदर,बाबुराव कांबळे ,आबासाहेब कांबळे ताराचंद गायकवाड,प्रशांत साठे ज्ञानेश्वर वाकळे ,बाबुराव साळवे, अमोल सूरभैया आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश औताडे म्हणाले की अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांची आज देशाला गरज असून, तळागाळातील मातंग समाज बहुजन समाज आज जागृत व्हायला लागला आहे ही बाब अतिशय सामाजिक दृष्ट्या प्रेरणादायक असून समाजाने अण्णाभाऊंच्या विचारावर चालले पाहिजे तसेच दीड दिवसाची शाळा ज्या व्यक्तिमत्त्वाने शिकून अनेक पदव्या बहाल केल्या अश्या महामानवाला आम्ही वंदन करतो, तसेच साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या जीवनाचा त्याग करून बहुजनांच्या समाज हितासाठी अनेक पुस्तके कादंबऱ्या लेख पोवाडे लिहून समाजापुढे क्रांतीची मशाल पेटवली अशा महामानवाला शासनाने विश्वरत्न पदवी बहाल करावी यासाठी शासन पातळीवरती पाठपुरावा करण्याचे मंगेश भाऊ औताडे य सांगितले देखील तसेच जयंती उत्सव करून फक्त समाज जागृत होणार नाही तर समाजाचे हक्क अधिकार समाजाच्या अन्यायाच्या अत्याचाराच्या विरोधात समाजाने एकटवले पाहिजे असे देखील मंगेश औताडे म्हणाले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे