वेळापुर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत घुसलेल्या नागास शिताफीने पकडुन विद्यार्थ्यांना वाचवले सर्पदंशापासून.
संपादक:- रवींद्र जगताप
कोपरगाव प्रतिनिधी :- कोपरगाव तालुक्यातील वेळापुर जिल्हा परिषद प्राथमिक शाळे मध्ये आढळलेल्या तिन फुटी नागास सर्पमित्र रमेश भोंगळ यांनी शिताफीने पकडुन विद्यार्थ्यांना सर्प दंशापासुन वाचवल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. हँलो मि शिंदे सर जिल्हा परिषद शाळा वेळापुर येथून बोलतोय आमच्या शाळेत वर्ग खोलीच्या भिंती जवळ सापाने बेडूक पकडलेला असुन शाळा चालू असल्याने विद्यार्थांच्या जिवाची आम्हास फार काळजी वाटत आहे असा फोन कोळपेवाडी चे सर्प मित्र रमेश भोंगळ यांना येताच अवघ्या सात मिनिटात शाळा गाठत बेडूकास दंश करुन गिळण्याच्या तयारीत असलेल्या तिन फुटी नागाला अलगद पकडून बरणी मध्ये बंदिस्त करताच शिक्षक विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवून सर्प मित्राचे स्वागत केले टिव्ही मध्ये सापास कसे पकडता हे आम्ही बघत होतो आज प्रत्यक्षात सापाला पकडताना बघुन आमची भिती कमी झाल्याची भावना विद्यार्थी वर्गाच्या चेहऱ्यावर दिसत होती.


