आमदार लहुजी कानडे यांच्या हस्ते समतादूत विशेषांकाचे प्रकाशन संपन्न
आमदार लहुजी कानडे यांच्या हस्ते समतादूत विशेषांकाचे प्रकाशन संपन्न
दिपक कदम /श्रीरामपूर :-मोहसिन शौकत शेख संपादित समतादूत स्वातंत्र्य दिन विशेषांकाचे प्रकाशन श्रीरामपूर चे लोकप्रिय आमदार लहुजी कानडे यांच्या हस्ते त्यांचा यशोधन कार्यालयात स्वातंत्र्य दिनी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी समता फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष शौकतभाई शेख, मा.नगरसेवक अशोक (नाना) कानडे, समतादूत चे संपादक मोहसीन शौकत शेख, हाजी इलाहिबक्ष कुरेशी, नदीमताज, मुश्ताकभाई शेख, इब्राहिमभाई शेख,सरताज शेख, इब्राहिम बागवान सर, ज्येष्ठ पत्रकार सलाऊद्दीन भाई शेख,दिलीप शेंडे सर, सौ.सुनंदाताई शेंडे मॅडम, अफजल मेमन आदि मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत आमदार श्री. लहूजी कानडे म्हणाले की, समतादूत हे नांव वर्तमानपत्रास मिळावं ही मोठी भाग्याची बाब आहे,समता प्रस्थापित करण्याची कामे ही मोठी जिकरीची असतात, कारण विषमते विरुद्ध समता असते, समाजात समता प्रस्थापित व्हावी याकरीता सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे तथा आवश्यक आहे.समता प्रस्थापित करण्यासाठी मोठमोठी विजारवंत थोर महापुरुषांनी आपले संपूर्ण जीवनपणाला लावले आहेत म्हणून लोकशाही रुपाने आपण आज समता बघत, जगत आणी उपभोगत आहोत हे त्याचेच गोड फळ आहे, आपल्या या समतादूत वर्तमानपत्रांतून देखील सर्वांना समान न्याय मिळावा, सामाजातील रांजले,गांजले उपेक्षित आणी दुर्लक्षितांचे प्रश्न सोडविण्यासाठीचा पुढाकार असावा,समतादूत विशेषांकास आमच्या सर्वांच्या हार्दिक शुभेच्छा आहेतच, यासोबतच यापुढे याविषयी जी काही मदत हवी असेल अशावेळी मी आपल्या सोबत असेल असेही ते म्हणाले.

या प्रसंगी समता फाऊंडेशनचे शौकतभाई शेख म्हणाले की, गत ३५ ते ४० वर्षांपासून आपण पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे, नवोदित संपादक/ पत्रकारांच्या विविध समस्यांना चालना मिळण्याकामी आपण स्वाभिमानी संपादक सेवा संघ या संपादकांच्या राज्यव्यापी संस्थेची १० वर्षांपूर्वी स्थापना केलेली असून या संघटनेच्या माध्यमातून नवोदित संपादक/ पत्रकारांचे विविध प्रश्न सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न केला जातो आहे,तथा संघटना सदस्यांचे राज्यभरात विविध ठिकाणी शंभरहून कधीक नियमित प्रसार माध्यमे सातत्याने सुरु असल्याने त्यातीलच एक समतादूत प्रसार माध्यम असल्याचे ते म्हणाले.या प्रसंगी संपादक मोहसीन शौकत शेख यांनी समतादूत वर्तमानपत्र विषयक आपली भुमिका विषद करताना सांगितले की, समतादूत हे वर्तमानपत्र हिंदी/ मराठी भाषिक असल्याने यामध्ये विचारवंत साहित्यिकांचे समतेला पोषक सामाजप्रबोधनात्मक लेख हे अग्रस्थानी असणार आहेत,तसेच सामाजास पोषक अशा प्रबोधनात्मक लेख – बातम्यांच्या माध्यमातून समाजासमाजात जनजागृती आणी एकोपा निर्माण होवून एकतेची भावना निर्माण व्हावी, ज्यामुळे सामाजासह देशाचा विकास घडू शकेल याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाणार असल्याचे ते म्हणाले.यावेळी अरुण पाटील नाईक, सचिन जगताप, अशोक भोसले, सरपंच कार्लस साठे, प्रमोद संसारे, राजेंद्र कोकणे, बंडू बोडके, बंडू कोकणे, राजेंद्र कोकणे, श्रीधर गाढे, शरद नन्नवरे, सतीश बोर्डे, आशिष शिंदे, हरिभाऊ बनसोडे, अमोल आदिक, नामदेव पाटील आदिक, ऍड.मधुकर भोसले,पी.एस. निकम सर, रवी अण्णा गायकवाड, अविनाश काळे,भाऊसाहेब तोरणे, संतोष गायकवाड निशिकांत पंडित, पत्रकार दिपक कदम आदि मान्यवर उपस्थित होते.


