गोदावरी नदीला महापूर तरी कोपरगावकरांना ८ दिवसाआड पाणी.:-माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील
गोदावरी नदीला महापूर तरी कोपरगावकरांना ८ दिवसाआड पाणी.:-माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील
नदीला पुर आल्याने व कॅनलला पाणी चालू असल्यामुळे आता तरी शहराचा पाणीपुरवठा ४ दिवसआड पूर्ववत करावा.
महिलांची पाण्यासाठी ची तारांबळ , पाणी दिवस कमी करून नगरपालिका प्रशासन कधी थांबवणार.

कोपरगाव प्रतिनिधी :- नगरपालिकेच्या फिल्टरेशन प्लांटला इंडस्ट्रीची एक्सप्रेस फीडर लाईन असून देखील पाण्याची टाकी भरली नाही या नावाखाली किती किती तास वेळेवर पाणी न सोडता महिलांना ताटकळत ठेवतात.पाणी सोडण्यात वेळेचा बदल होत असल्यास त्या भागातील वॉलमन ने फिरून तेथील नागरिकांना पाण्याची येण्याची वेळ कळवली पाहिजे.
उन्हाळ्यात धरणांमध्ये पाणी नाही हे कारण सांगून १३ ते १४ दिवसाआड पाणीपुरवठा कोपरगाव शहरातील नागरिकांना नगरपालिकेने केला.

आता नदीला ह्या पावसाळ्यातला दुसरा पूर आलाय, कॅनल भरभरून वाहत आहे, तरीसुद्धा नगरपालिका जनतेला ४ दिवसाआड पाणीपुरवठा पूर्ववत करून का दिला देत नाही. जनतेला का वेठीस धरले जाते.जनतेकडून पाणी दिवस कमी करायची मागणी केल्याशिवाय नगरपरिषद प्रशासन पाणी दिवस पूर्ववत चार दिवसाआड का करत नाही.ही खेदाची बाब असून. पाण्यासारख्या महत्त्वाच्या गोष्टीकडे ज्यामुळे शहरातील महिलांचे मोठ्या प्रमाणात तारांबळ होऊन हाल होतात . पाणी साठवून ठेवण्यासाठी झोपडपट्टी भागात लोक पातेल्यांमध्ये, घागरी मध्ये पाणी साचवतात आणि दुसरीकडे नगरपालिका सांगती की पाणी साठवून ठेवू नका डेंग्यूचे डास तयार होतात आणि दुसऱ्या बाजूला नगरपालिका पाणी दिवस कमी करायचा गांभीर्याने विचार करायला तयार नाही. एकीकडे खूप डासांचा त्रास आणि दुसरीकडे आठ दिवसात पाणी. यांच्या जीवाशी हे खेळायचे काम चालू आहे.नगरपालिकेला पूर्ण पाणीपट्टी भरून देखील सुद्धा नागरिकांना वेळेवर स्वच्छ पाणी पिण्यासाठी नगरपालिका का देत नाही याचा खुलासा नगरपालिकेने केला पाहिजे.आता तर नदीला पूर आलाय, कॅनल चालू आहे .तरी नगरपालिकेने ४ दिवसाआड तात्काळ पाणी पूर्वत करून स्वच्छ पाणी पुरवठा नागरिकांना करावा ही विनंती



