
बुद्ध विहाराच्या शेडसाठी आमदार आशुतोष काळे यांनी केली एक लाखाची मदत
दलित समाजासाठी आमदार आशुतोष काळे एक पाऊल पुढे
कोपरगाव प्रतिनिधी :-कोपरगाव मतदार संघातील कर्तव्यदक्ष आमदार आशुतोष दादा काळे यांनी कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी मोठा निधी आणून कोपरगावचा मोठा विकास केला आहे प्रत्येक समाजासाठी त्यांनी मदत केली आहे आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव विधानसभेचा कायापलट केला आहे कोपरगाव शहरातील बौद्ध समाजाचे महत्त्वाचे असलेले प्रार्थना स्थळ म्हणजे बौद्ध विहार होय. या बौद्ध विहारासाठी यापूर्वी देखील आमदार आशुतोष दादा काळे यांनी मदत केलेली आहे.यापूर्वी लुंबिनी बुद्ध विहार या ठिकाणी रस्त्याला १५ लाखाची मदत त्यांनी केली आहे.आंबेडकरी समाजाच्या आग्रहस्तव महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आदर्श शिंदे यांचा गायनाचा कार्यक्रम देखील त्यांनी आयोजित केला होता. .लुम्बिनी विहारात पावसामुळे तसेच उन्हाळ्यात कार्यक्रम घेण्यासाठी अडचणी येतात. यासाठी शेडची आवश्कता आहे.यासंदर्भात समाजातील नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांच्या कडे निवेदनाव्दारे मागणी केली असता त्यांनी आता पुन्हा एकदा लुंम्बिनी बुद्ध विहाराच्या शेड साठी १ लाख रुपयांची मदत त्यांनी केली आहे.या संदर्भात अधिक माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील दलित समाजाच्या कार्यकर्त्यांनी आमदार आशुतोष दादा काळे यांच्याशी भ्रमणध्वनी व्दारे चर्चा केली लवकरच हा निधी तत्काळ सुपूर्त केला जाईल असे आमदार आशुतोष काळे यांनी भम्रणध्वनी व्दारे चर्चेतुन कळविले आहे.आमदार आशुतोष काळे यांनी दलित समाजाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमी पुढे असतात, ते नेहमी अनेक समस्या सोडून प्रत्येक समाजासाठी ते काम करत आहेत. आमदार आशुतोष काळे यांनी १ लाख रुपयाची मदत केल्याबद्दल सकल आंबेडकरी समाज तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील सर्व दलित समाजातील पदाधिकारी यांनी आभार मानले आहे प्रकाश दुशिंग संतोष शेजवळ माजी नगरसेवक संदीप पगारे,माजी नगरसेवक दिनेश कांबळे रोशन शेजवळ दिनकर खरे,रावसाहेब साठे,शंकर घोडेराव मनोज शिंदे कार्तिक सरदार राहुल शिरसाठ यांच्यासह अनेकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे



