कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील जनता इंग्लिश स्कूल मध्ये मुंबई येथील उल्हास ट्रस्ट उल्हासनगर, मुंबई यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील जनता इंग्लिश स्कूल मध्ये मुंबई येथील उल्हास ट्रस्ट उल्हासनगर, मुंबई यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप
संवत्सर:: कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील जनता इंग्लिश स्कूल मध्ये मुंबई येथील उल्हास ट्रस्ट उल्हासनगर, मुंबई यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप उल्हास ट्रस्ट उल्हासनगर, मुंबई यांच्या वतीने सन २०२३- २४ इयत्ता नववी इयत्ता दहावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेमध्ये प्रथम पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना एक हजार रुपये शिष्यवृत्ती देऊन सन्मानित करण्यात आले . यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे होते .मागील शैक्षणिक वर्षापासून नियमितपणे इयत्ता आठवी इयत्ता दहावी मध्ये प्रथम पाच क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना रुपये १००० शिष्यवृत्ती दिली जाते ..या वर्षी विद्यालयाचे मार्गदर्शक पांडुरंग शास्त्री शिंदे ,सल्लागार सदस्य मधुकर साबळे व्हरतुसा कंपनीचे सॉफ्टवेअर डेव्हलपर इंजिनिअर व उल्हास ट्रस्टचे विश्वस्त सदस्य शरद शिंदे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थिती गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक मोरे आर एस यांनी केले. समिती सदस्य आणि मधुकर साबळे पाटील यांचे मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक वाघमारे एस के यांनी केले तर याप्रसंगी पर्यवेक्षक श्री भोये एम जी सर, श्री ढोले सर, श्री दवंगे सी के सर उपस्थित होते . आभार श्री शिंदे बी एम सर यांनी मानले.



