धार्मिकमहाराष्ट्र

शासन निर्णय नुसार शासन स्तरावर श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा करण्यात यावा श्री कृष्ण मंदिर महानुभाव आश्रम शिंगणापूर संचालिका त.नंदाताई कपाटे महानुभाव

शासन निर्णय नुसार शासन स्तरावर श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा करण्यात यावा श्री कृष्ण मंदिर महानुभाव आश्रम शिंगणापूर संचालिका त.नंदाताई कपाटे महानुभाव

महाराष्ट्र शासनाच्या दि. १८ जानेवारी २०२४ चे परिपत्रकानुसार सन २०२४ पासून परमेश्वर अवतार महानुभाव पंथाचे प्रवर्तक भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन भाद्रपद शुद्ध द्वितीया रोजी गुरूवार दिनांक ०५ सप्टेंबर २०२४ रोजी शासन स्तरावर साजरी करण्यात येत आहे.
शासनाचे परिपत्रकानुसार सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय आदी स्तरावर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी अवतार दिन साजरा करण्यात यावी, याकरिता श्री.कृष्ण मंदिर महानुभाव आश्रम शिंगणापुर ता.कोपरगाव महानुभाव पंथीय भक्तगण उपदेशी भजनी मंडळ शिंगणापूर यांनी कोपरगाव पोलीस निरिक्षक मथुरे साहेब यांची भेट घेत त्यांचे कार्यालयात जाऊन दि.४ सष्टेबर २०२४ रोजी निवेदन सादर केले. त्याच बरोबर सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचे एक तैलचित्र ही भेट दिले.
परब्रम्ह परमेश्वर अवतार तथा महानुभाव पंथ प्रवर्तक सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी यांनी ८०० वर्षांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राभर पायी परिभ्रमण करून तळागाळातील जनतेला ज्ञानामृत दिले. स्वातंत्र्य, समता, बंधुता, अहिंसा, सहिष्णुता इत्यादी नितीमुल्यांचा जनतेला उपदेश केला. जात-पात, स्पृश्या-स्पृश्य, भेदभाव दूर करण्यासाठी श्री चक्रधर स्वामींनी समाजक्रांती केली. दारू-मांसाहारादी सप्त व्यसनापासून दूर राहण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण उपदेश श्री चक्रधर स्वामींनी जनतेला दिला.

जाहिरात

“महाराष्ट्री असावे मराठीच बोलावे” असा महाराष्ट्राचा आद्य गौरव करणारे श्री चक्रधर स्वामी यांचे महाराष्ट्र व मराठी भाषेवर अपार प्रेम होते. म्हणूनच महामहिम विद्वान श्री महाइंभट यांनी ‘लिळाचरित्र’ नावाचा मराठी भाषेचा आद्यग्रंथ लिहिला, मराठी भाषेची आद्य कवयित्री ‘महदंबा’ ही श्री चक्रधर स्वामींची शिष्या, ‘ढवळे’ हा काव्यग्रंथ मराठी भाषेत प्रसिध्द आहे कोपरगांव पोलीस निरिक्षक मथुरे यांना निवेदन व तैलचित्र भेट देताना श्री कृष्ण मंदिर महानुभाव आश्रम शिंगणापूर संचालिका प.पु.त.नंदाताई कपाटे महानुभाव पोलिस पाटील प्रशांत आढाव विठ्ठल संवत्सर कर सामाजिक कार्यकर्ते किशोर चोरगे आदि अनेक मान्यवर उपदेशी भजनी मंडळ शिंगणापूर उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे