पुरुषोत्तम पगारे सर यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान
पुरुषोत्तम पगारे सर यांना समाज भूषण पुरस्कार प्रदान
संपादक :- रवींद्र जगताप
कोपरगाव (वार्ताहर)विश्वकर्मा सोशल वेलफेअर फौडेशन ट्रस्ट पुणे यांच्या वतिने समाज भूषण पुरस्कार येथील राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पुरुषोत्तम पगारे सर यांना अतिशय मंगलमय वातावरणात पुणे येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले नाट्यगृहामध्ये प्रदान करण्यात आला.

पुरुषोत्तम पगारे सर गेल्या ४० वर्षापासून शैक्षणिक व सामाजिक चळवळीत विविध संस्थाच्या पदावर कार्यरत आहे. गेल्या ३३ वर्षापासून शैक्षणिक दृष्ट्या वंचितासाठी विनाअनुदानित रात्र शाळा चालवित आहे. परित्यक्ता स्रियांचे प्रश्न सोडविणे, राष्ट्रभाषा हिंदी प्रचार व प्रसार, हिंदी शिक्षकांची प्रबोधन शिबीरे घेणे, हिंदी विषय शिक्षकांना पुरस्कार देणे व संघटन चालविणे, राज्य पातळीवर सामाजिक कार्यकर्त्याना पुरस्कार देणे, वाचन संस्कृती वाढविणे. वंचितांची विविध कामे करणे. अशी अनेक समाजोपयोगी कामे करीत आहे . रयत शिक्षण संस्थेत असतांना शालेय पातळीवर विद्यार्थी व विद्यार्थीनी साठी अनेक शैक्षणिक उपक्रम राबविले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून या सोहळ्याचे प्रमुख अतिथी मा. प्रा. डॉ. प्रशांतजी साठे, बी.एम.सी.सी. कॉलेज पुणे यांच्या हस्ते समाज भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.डॉ.साठे यांनी वेळेचे महत्त्व याची अतिशय सुंदर अशी विषय मांडणी करीत मौलिक अश्या विचारांनी सर्वांना प्रभावित केले. त्याच प्रमाणे मा.श्री. मयूरजी भावे, उपसंपादक दै. सकाळ, यांनी सामाजिक संस्था करीत असलेले कार्य व आज एकसंघ, एक राष्ट्र म्हणून एकत्र असण्याची आवश्यकता यावर अतिशय प्रखर आणि प्रभावी विचार मांडले.कार्यक्रमाचे प्रास्तविक फौंडेशनचे संस्थापक सदस्य विवेकानंदजी सुतार यांनी केले. यावेळी राज्यातून आलेल्या १० ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा व अनेक गुणवंत विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला.


