घारी येथील बिरोबा देवस्थानचा यात्रा उत्सव संपन्न
घारी येथील बिरोबा देवस्थानचा यात्रा उत्सव भाविक भक्तांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करत संपन्न झाला. घारी येथील बिरोबा देवस्थान हे अतिशय जागृत देवस्थान म्हणून परिसरात ओळखले जाते.

देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष श्री.किशोर बढे (बाबा) यांचे हस्ते मूर्तीला विधिवत अभिषेक करून गंगास्नान व धार्मिक विधी पार पडला. देवाच्या भेटीला परिसरातील शिर्डी बिरोबा बन, संवत्सर, राहता, डाऊच खुर्द, सावळीविहीर आदी ठिकाणच्या देवाच्या काठ्यांना निमंत्रीत करण्यात आले होते. देवाच्या भेटीसाठी निमंत्रित काठ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गावाला वळसा घालत सर्व देवदेवतांचे दर्शन घेत देवाच्या काठीची मिरवणूक मंदिर परिसरात आल्यावर महाआरती करण्यात आली. देवस्थानच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादानंतर देवाची गादी (होईक) चा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी देवस्थानचे सर्वेसर्वा तथा संस्थापक श्री. किशोर बढे (बाबा), लहानु जाधव, गणेश बढे, सचिन चौधरी, पंढरीनाथ बढे, हरिभाऊ कांदळकर, विलास मेचे, गणेश गिधाड, धोंडीराम बढे, सतीश वैद्य, नाना कोळगे, चंद्रकात पारखे, अंबादास वायकर, गौरव जाधव आदिनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी परिसरातून मोठ्या संख्येने भाविक भक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.घारी येथील बिरोबा देवस्थानचा यात्रा उत्सव भाविक भक्तांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करत संपन्न झाला. घारी येथील बिरोबा देवस्थान हे अतिशय जागृत देवस्थान म्हणून परिसरात ओळखले जाते.देवस्थानचे संस्थापक अध्यक्ष श्री.किशोर बढे (बाबा) यांचे हस्ते मूर्तीला विधिवत अभिषेक करून गंगास्नान व धार्मिक विधी पार पडला. देवाच्या भेटीला परिसरातील शिर्डी बिरोबा बन, संवत्सर, राहता, डाऊच खुर्द, सावळीविहीर आदी ठिकाणच्या देवाच्या काठ्यांना निमंत्रीत करण्यात आले होते. देवाच्या भेटीसाठी निमंत्रित काठ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. संपूर्ण गावाला वळसा घालत सर्व देवदेवतांचे दर्शन घेत देवाच्या काठीची मिरवणूक मंदिर परिसरात आल्यावर महाआरती करण्यात आली. देवस्थानच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसादानंतर देवाची गादी (होईक) चा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी देवस्थानचे सर्वेसर्वा तथा संस्थापक श्री. किशोर बढे (बाबा), लहानु जाधव, गणेश बढे, सचिन चौधरी, पंढरीनाथ बढे, हरिभाऊ कांदळकर, विलास मेचे, गणेश गिधाड, धोंडीराम बढे, सतीश वैद्य, नाना कोळगे, चंद्रकात पारखे, अंबादास वायकर, गौरव जाधव आदिनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी परिसरातून मोठ्या संख्येने भाविक भक्त व ग्रामस्थ उपस्थित होते.



