सामाजिक

मातंग अस्मिता संघर्ष सेनेच्या युवक जिल्हाध्यक्ष पदी सुजल छगनराव चंदनशिव यांची निवड

मातंग अस्मिता संघर्ष सेनेच्या युवक जिल्हाध्यक्ष पदी सुजल छगनराव चंदनशिव यांची निवड

 कोपरगाव:- मातंग अस्मिता संघर्ष सेना या सामाजिक संघटनेची नुकतीच बैठक संपन्न झाली आहे या बैठकीत  सुजल छगनराव चंदनशिव सुभाषनगर, धारणगांव रोड, नवीन पोस्ट ऑफिस, कोपरगांव, जि. अ.नगर यांची एकमताने अहमदनगर युवक जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे सुजल चंदनशिव हे अनेक वर्षांपासून सामाजिक काम करत आहेत समाजाच्या विविध प्रश्नांवर सातत्याने ते लढा देत आहेत त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची युवक जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे राज्यघटनेच्या उद्देशीकेनुसार या देशातील वंचित, उपेक्षित, घटकांना शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रात समान संधी, समतोल विकास, पर्याप्त प्रतिनिधित्व मिळवुन देऊन एक समताधिष्ठ समाज निर्मितीसाठी सर्व समाज घटकांना एकत्रित करण्याची सामाजिक जबाबदारी या पदाच्या माध्यमातून  सोपविण्यात येत आहे, समस्त महापुरुषांच्या मानवतावादी विचारधारेला प्रमाण माणून मातंग समाजा सहित बहुजनांनच्या न्याय हक्कासाठी आपण सातत्याने यां व्यवस्थेविरुध्द संविधानिक पध्दतीने लढा देऊन न्याय मिळऊन द्यावे. खऱ्या अर्थाने आपली संघटना महापुरुषांच्या विचाराचा वारसा, समतेचा गाडा पुढे घेऊन जात आहे. तरी ही सामाजिक जबाबदारी निष्ठेने सदसदविवेक बुध्दीने, निर्भिड व निष्कलंक, निस्वार्थीपणे पार पाडावी, तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी संविधानिक मार्गाने सामाजिक न्याय व हक्क मिळवून देण्याचे विधायक कार्य करण्यासाठी  व संघटनेशी एकनिष्ठ राहावे संघटना वाढीसाठी सदैव प्रयत्नशील राहावे असे विविध सामाजिक कार्याची जबाबदारी त्यांच्यावर युवक जिल्हाध्यक्ष पदाच्या माध्यमातून सोपविण्यात आली आहे. राजाभाई सूर्यवंशी संस्थापक अध्यक्ष पंडित हनुमंते सचिव चंपत गबाले कला क्रिडा सांस्कृतिक विभाग प्रमुख, सुर्यकांत तादलापुरकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भागचंद नवगिरे जिल्हाध्यक्ष यांच्या सहिने निवडीचे पत्र त्यांना देण्यात आले आहे या कार्यक्रमाचे.संदीप ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले मोनु भाउ म्हस्के यांनी  आभार मानले. तसेच सामाजिक कार्यकर्ते अजित राऊत. संतोष पडवळ. साई शेलार आदीनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे.

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे