सामाजिक

कर्मवीरांच्या दातृत्वाचा वसा आणि वारसा रयतच्या विद्यार्थ्यांनी जागृत ठेवला- प्रमोद तोरणे

कर्मवीरांच्या दातृत्वाचा वसा आणि वारसा रयतच्या विद्यार्थ्यांनी जागृत ठेवला- प्रमोद तोरणे

रामेश्वर विद्यालय येथे कर्मवीर जयंती उत्साहात साजरी

कोपरगाव(प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील अण्णा यांची १३७ वी जयंती वारी येथील श्री रामेश्वर विद्यालयात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवन कार्याबद्दल बोलताना रयतेचे सहाय्यक विभागीय अधिकारी श्री प्रमोद तोरणे यांनी कर्मवीरांच्या दातृत्वाचा वसा आणि वारसा रयतच्या विद्यार्थ्यांनी पुढे सुरु ठेवल्याचे गौरवोद्गार काढले. कर्मवीरांनी गोरगरीब, वंचित बहुजनांच्या शिक्षणासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाच्या शैक्षणिक वारशाचे जतन केले आहे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन आपल्या जीवनात यशस्वी झालेले आहेत.
श्री रामेश्वर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गावात कर्मवीर रथाची मिरवणूक काढून विविध गीतांवर दांडिया नृत्य सादर केले. त्यानंतर विद्यालयात कर्मवीर जयंती निमित्ताने पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी काढलेल्या रांगोळी कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. समूह स्वागत गीताने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे अँड श्री शरद जोशी होते इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी कु.ईशा महाले हिने कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवन प्रवास यावर सुरेख भाषण केले.विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री सुधाकर साळुंके यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यालयात सुरू असलेल्या विविध शैक्षणीक उपक्रमांची माहिती सर्वांसमोर मांडली विद्यालयातील माजी विद्यार्थी व शिक्षण प्रेमी ग्रामस्थ यांच्या लोकसहभागातून विद्यालयात विद्यार्थी सायकल बँक योजना सुरू करण्यात आली असून या उपक्रमाअंतर्गत शाळेतील गरीब गरजु विद्यार्थ्यांसाठी माजी विद्यार्थी अभिषेक काजळे यानें त्यांच्या पहिल्या पगरातून सात सायकली भेट दिल्या त्याचे याप्रसंगी वितरण करण्यात आले यावेळी विद्यालयातील एस एस सी परीक्षा मार्च २४ मधील गुणवंत विद्यार्थ्यांना विविध मान्यवरांनी दिलेली तसेच संस्थेमार्फत देण्यात येणारी पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आली.

जाहिरात

या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या स्थानिक स्कूल कमिटीचे सदस्य श्री सुरेश जाधव, माजी सदस्य श्री मच्छिंद्र टेके, मा.सरपंच सतीश कानडे,बद्रीनाथ जाधव,उपसरपंच श्री विजुभाऊ गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य पत्रकार रोहित टेके, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते नामदेवभाऊ जाधव, मधुकरराव टेके,परशराम टेके,सर्जेराव टेके, सचिन टेके, अशोकराव कानडे, माजी विद्यार्थी किरण काळे,डॉ हिमांशू त्रिवेदी,कान्हेगाव येथील प्रकाश काजळे,रावसाहेब करडे, अभिषेक काजळे, विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.

संपादक :- रवींद्र जगताप
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे