ब्रेकिंग

रयत संकुल’ कोपरगाव शहर यांच्या वतीने ‘कर्मवीर जयंती’ कार्यक्रमाचे आयोजन

रयत संकुल’ कोपरगाव शहर यांच्या वतीने ‘कर्मवीर जयंती’ कार्यक्रमाचे आयोजन

कोपरगाव :- रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३७ व्या जयंती निमित्ताने एस. एस. जी. एम. महाविद्यालयाच्या डॉ. होमी भाभा प्रांगणात ‘कर्मवीर जयंती’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा. ॲड. भगीरथ शिंदे तर  रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन मा. श्री. चंद्रकांत दळवी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  प्रमुख वक्ते म्हणून मा. श्री. एस. झेड. देशमुख संगमनेर, डॉ. श्री. ज्ञानेश्वर वाघचौरे (प्रसिद्ध उद्योजक) हे प्रमुख वक्ते लाभणार आहेत.

जाहिरात

या कार्यक्रमाला मा. आमदार श्री आशूतोष काळे सदस्य- महाराष्ट्र विधानसभा., अध्यक्ष – उत्तर विभाग रयत शिक्षण संस्था सातारा, मा. श्री. अशोकराव काळे,मा.श्री. बिपिनदादा कोल्हे, मा. श्री पद्माकांत कुदळे, मा. श्री. कारभारी आगवन, मा. श्री. मच्छिंद्र रोहमारे ,मा. श्री. बाळासाहेब कदम, मा. श्री. अरुण चंद्रे, मा. श्री.ॲड संदीप वर्पे सदस्य,जनरल बॉडी रयत शिक्षण संस्था सातारा, मा. सौ.  चैतालीताई काळे, मा. श्री. विवेक कोल्हे, मा. श्री. महेंद्रकुमार काले, मा. श्री. बाळासाहेब आव्हाड, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होत आहे.बहुजनांना शिक्षणाची दारे खुली करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे महान कार्य पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले आहे. त्यांच्या कार्याचे स्मरण    ठेवण्यासाठी आज महाराष्ट्रभर कर्मवीर जयंती साजरी केली जाते आहे. सदर कार्यक्रम शुक्रवार दिनांक २७ सप्टेंबर २०२४ रोजी साजरा होत आहे. हा समारंभ श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव, कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व तांत्रिक विद्यालय कोपरगाव, डॉ. सी.एम.मेहता कन्या विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज कोपरगाव, पद्मा मेहता प्राथमिक विद्यामंदिर कोपरगाव, कर्मवीर भाऊराव पाटील प्राथमिक विद्यालय कोपरगाव, यांच्या संयुक्त विद्यमाने होत आहे. या कार्यक्रमासाठी रयत प्रेमी व ग्रामस्थांनी, विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्या डॉ. उज्ज्वला भोर, मुख्याध्यापिका सौ. प्रमोदिनी शेलार, मुख्याध्यापक श्री. शहाजी सातव, मुख्याध्यापक श्री. सुभाष दरेकर, मुख्याध्यापक श्री. नंदकुमार खाडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रोफेसर डॉ. बाबासाहेब शेंडगे यांनी केले आहे.



संपादक रवींद्र जगताप

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे