महाराष्ट्र
कोपरगावातील तरुणांनी थेट फडणवीसांची घेतली भेट
कोपरगावातील तरुणांनी थेट फडणवीसांची घेतली भेट
लोकशाहिर आण्णाभाऊ साठे पुतळा प्रकरण
कोपरगाव शहरामध्ये अनेक वर्षानंतर साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्ण कृती पुतळा स्थापन करण्यात आला आहे परंतु या पुतळ्याचे शासकीय लोकार्पण सोहळा अद्यापही झाला नाही यासाठी समाज बांधवांनी वेळोवेळी आंदोलने देखील केली गेल्या तीन वर्षांपासून हा शासकीय लोकार्पण सोहळा का होत नाही ? हा प्रश्न कोपरगावकरांसह मातंग समाजाला देखील पडला आहे अनेक वेळा आंदोलने झाली परंतु नगर परिषदे कडून कुठलेही पद्धतीने यावर ठोस पावले उचलली जात नाही त्यामुळे शहरातील तरुणांनी या विरोधामध्ये आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील दिला आहे नुकतेच.२७ सप्टेंबर रोजी शिर्डी या ठिकाणी महिला सशक्तीकरण या कार्यक्रमा साठी महाराष्ट्र राज्याचे उमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब आले असता त्यांना कोपरगाव शहरातील साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे स्मारकाचे लोकार्पण सोहळा करण्यासाठी योग्य कारवाई करुन याकामी तारीख मिळावी असे आशेचे निवेदन देण्यात आले यावेळी निवेदन देण्यासाठी संदीप निरभवणे अनिल जाधव, दौलत शिरसाठ उपस्थित होते.

थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली आहे आता यावर काय निर्णय होतो यकडे बघावे लागेल परंतु मातंग समाज क्रांती मोर्चाच्या वतीने आमरण उपोषणाचा इशारा या तरुणांनी दिलेला आहेच नगर परिषदेने हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावा जेणेकरून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होईल




