महाराष्ट्र
साई संजीवनी बँकेस राज्यस्तरावरील सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार
कोपरगांव येथील साई संजीवनी बँकेस सलग दहाव्यांदा महाराष्ट्र अर्बन को. ऑपरेटीव्ह बॅक्स फेडरेशन यांच्यावतींने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट राज्यस्तरीय बँक केंद्रीय सहकारराज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते पुणे येथे प्रदान करण्यांत आला.
साई संजीवनी बँकेस राज्यस्तरावरील सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार
कोपरगांव :माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली व संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे,संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे,माजी आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या येथील साई संजीवनी बँकेस सलग दहाव्यांदा युनिट बँका व तीनशे कोटी पर्यंत ठेवी असलेल्या बँक गटात राज्यस्तरावरील द्वितीय क्रमांकाचा सर्वोकृष्ट बँक पुरस्कार नुकताच पुणे येथे केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते मिळाल्याची माहिती बँकेचे माजी अध्यक्ष, युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली.

अडचणींतुन मार्ग काढत साई संजीवनी बँकेने ३०० कोटी रूपये पर्यंत ठेवी असणां-या गटात स्थान पटकावले आहे. महाराष्ट्र अर्बन को. ऑपरेटीव्ह बँक्स फेडरेशन दरवर्षी राज्यभरातील सहकारी बँकींग क्षेत्रात उत्तम कामगिरी करणा-या सभासद नागरी सहकारी बँकांच्या कार्याची दखल घेवुन त्यांना पुरस्कार प्रदान करत असते. बँकेचे संचालक, सर्व ठेवीदार सभासद शेतकरी हितचिंतक यांनी बँक कारभारावर दाखविलेल्या अढळ विश्वासामुळेच बँकेस हा पुरस्कार मिळाल्याचे विवेकभैय्या कोल्हे यांनी सांगितले.

ग्रामिण अर्थकारणांला बळ देवुन सहकारातुन समृध्दी घडविण्यांत कार्यरत असलेल्या बँकांना अधिकाधिक प्रोत्साहन यातुन मिळत असते. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी दुरदृष्टीकोनातुन सहकारी साखर कारखानदारी बरोबरच आर्थीक पतपुरवठ्यासाठी साईसंजीवनी को. ऑपरेटीव्ह बँकेची स्थापना केली. त्यातुन शेतक-यांना आर्थीक पाठबळ देत शेती फुलवत अनेक नवउद्योजकांना कर्ज पुरवठा केलेला आहे. बँकेचे विद्यमान अध्यक्ष शरद थोरात, उपाध्यक्ष जयंतीलाल पटेल, सर्व संचालक मंडळाचा कारभार गौरवास्पद असल्याचे विवेकभैय्या कोल्हे यांनी सांगितले. केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, महाराष्ट्र अर्बन को. ऑपरेटीव्ह बँक फेडरेशनचे अध्यक्ष श्री. विद्याधर अनास्कर, उपाध्यक्ष श्री. रमाकांत खेतान, अर्थतज्ञ व सहकार क्षेत्रातील अन्य मान्यवरांच्या हस्ते सदरचा पुरस्कार गणेशखिंड पुणे येथे प्रदान करण्यांत आला.साई संजीवनी बँकेचे उपाध्यक्ष जयंतीलाल पटेल, संचालक सर्वश्री नानासाहेब गव्हाणे, बाळासाहेब निकोले, सुरेश जाधव, रामदास देवकर, कचेश्वर माळी, दिलीप बनकर, माधव गोसावी, विधीज्ञ अशोकराव टुपके, सोपानराव चिने, मुख्य सर व्यवस्थापक पदमाकर सभारंजक, यांच्यासह सर्व सभासद, विविध क्षेत्रातील पदाधिकारी यांनी स्विकारला. साई संजीवनी बँकेचे अनेकांनी अभिनंदन केले.



