सोमय्या विद्यामंदिर,साकरवडी शाळेचे राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक..
सोमय्या विद्यामंदिर,साकरवडी शाळेचे राज्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांक..
उपविजेतेपदाचा मुकुट सोमय्या विद्यामंदिर कडे
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परभणी आयोजित राज्यस्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल, परभणी येथे दिनांक 23 ते 25सप्टेंबर 2024 या कालावधीत पार पडल्या. या स्पर्धेत सोमैया विद्यामंदिर, साकरवाडीच्या 19 वर्षाखालील मुलींच्या संघाने सलग तिसऱ्या वर्षी संपूर्ण पुणे विभागाचे नेतृत्व करत संपूर्ण महाराष्ट्रात उपविजेतेपद पटकाविले आहे.विशेष महत्त्वाची बाब म्हणजे ग्रामीण भागातील खेळाडूंनी टेबल टेनिस सारख्या खेळात पुण्याच्या तीन बलाढ्य संघांना पराभूत करून पुणे विभागाचे नेतृत्व केले.राज्यस्तरीय स्पर्धेत सुद्धा नागपूर,नाशिक या विभागांना पराभूत करून उपविजेतेपद पटकाविले.या सर्व यशाचे श्रेय जाते संस्थेचे अध्यक्ष आदरणीय समीर सर यांना कारण ग्रामीण भागातून सुद्धा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू निर्माण व्हावेत म्हणून त्यांनी शहरापेक्षा उत्तम सुविधा साकरवाडी सारख्या खेड्यात उपलब्ध करून दिल्यात सातत्याने ते मुलांना प्रोत्साहन देतात.तसेच सचिव सुहासजी गोडगे, प्राचार्य सौ. सुनीता पारे,स्पोर्ट्स अकादमीचे प्रमुख एझाझ सर,आदित्य सर,समन्वयक शेळके मॅडम,क्रीडाधिकारी विशाल गर्जे, तालुका क्रीडा समिती यांचेही सहकार्य खेळाडूंना सातत्याने लाभते.सर्व खेळाडूंना क्रीडाशिक्षक अमोलिक सर यांचे मार्गदर्शन लाभले.




