ब्रेकिंग

रस्त्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी आपले प्रश्न बिनदिक्कतपणे मांडावे – ना. आशुतोष काळे

कोपरगाव शहरात सुरु असलेल्या विविध रस्त्याच्या कामांची पाहणी करतांना ना. आशुतोष काळे

कोपरगाव प्रतिनिधी  :- कोपरगाव शहरातील सर्वच मुख्य रस्त्यांचे काम प्रगतीपथावर असून या रस्त्याच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी आपले प्रश्न बिनदिक्कतपणे मांडावे असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी केले आहे.कोपरगाव शहरात सुरु असलेल्या विविध रस्त्याच्या कामांची ना. आशुतोष काळे यांनी नुकतीच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांसमवेत पाहणी केली. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, नगरसेवक मंदार पहाडेराजेंद्र वाकचौरे,गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदारयुवक शहराध्यक्ष नवाज कुरेशीविद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदारराहुल देवळालीकरजावेद शेख,धनंजय कहारवाल्मिक लहिरेऋषिकेश खैरनारविकि जोशीगणेश लकारेगणेश बोराडेविजय शिंदेश्याम ओढेकरप्रकाश मोराडेअनिल लचुरेदिनेश संतविजय शिदोरे,नगरपपरिषद अभियंता सुनील ताजवेसहाय्यक अभियंता हर्षवर्धन सुराळकरनिलेश बुचकुले,ठेकेदार एस. के. येवले आदी उपस्थित होते.रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण होण्यासाठी ठेकेदारांनी काळजी घ्यावी. रस्त्यांसाठी निधी वारंवार मिळत नाही त्यामुळे होणारे रस्ते चांगल्या दर्जाचे व्हावेत अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा असते. त्यामुळे सुरु असलेल्या रस्त्यांची कामे नागरिकांच्या सूचनांचा आदर करून रस्त्यांच्या कामाच्या बाबतीत गुणवत्ता राखण्यासाठी सबंधित ठेकेदारास योग्य त्या सूचना देवून नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे दर्जेदार रस्ते तयार करून घेणार असल्याचे  ना. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे