महाराष्ट्र

गौतम सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संजय आगवन यांची निवड

गौतम सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करतांना आ.आशुतोष काळे समवेत व्हा.चेअरमन बापूराव जावळे, संचालक मंडळ.

गौतम सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संजय आगवन यांची निवड

कोळपेवाडी वार्ताहर :- सहकार क्षेत्रातील अग्रगण्य बँक अशी ओळख असलेल्या गौतम सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी संजय कारभारी आगवन यांची एकमताने निवड करण्यात आली असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे यांनी दिली आहे.गौतम सहकारी बँकेचे विद्यमान अध्यक्ष सुधाकर दंडवते यांचे काही महिन्यांपूर्वी अकस्मात निधन झाल्यामुळे रिक्त असलेल्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी गौतम सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची सभा सोमवार (दि.१४) रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयात संपन्न झाली. संजय कारभारी आगवन यांची चेअरमन पदाची सूचना बाबुराव थोरात यांनी आणली त्या सूचनेस बापूसाहेब वक्ते यांनी अनुमोदन दिले. यावेळी एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे संजय कारभारी आगवन यांची बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याची घोषणा नामदेव ठोंबळ अध्यासी अधिकारी तथा सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कोपरगाव यांनी केली.

जाहिरात

नवनिर्वाचित अध्यक्ष संजय आगवन यांचे माजी आ.अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या प्रसंगी व्हा चेअरमन बापूराव जावळे, संचालक राजेंद्र ढोमसे, बाबुराव थोरात, श्रीकांत तिरसे, विजयराव रक्ताटे,कमलाकर चांदगुडे, बापूसाहेब वक्ते, तुकाराम हूळेकर, सुनील डोंगरे, उत्तम भालेराव,सौ. सिंधुताई रोहोम, सौ. रूपाली संवत्सरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण पावडे,प्रशासकीय अधिकारी बापूसाहेब घेमूड, वरिष्ठ अधिकारी नानासाहेब बनसोडे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना नवनिर्वाचित अध्यक्ष संजय आगवन म्हणाले की, गौतम सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देवून माजी आ.अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांनी जो विश्वास दाखविला त्याबद्दल आभार मानले. माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाला तडा जावू न देता व्हा.चेअरमन, संचालक मंडळ, सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या सहकार्यातून गौतम बँकेचा आदर्श कारभार करून आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम बँक प्रगतीच्या शिखरावर घेवून जाणार असल्याचे सांगितले.



संपादक रवींद्र जगताप

 

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे