गुन्हेगारी

खुनाच्या गुन्ह्यात दवाखान्यातून पसार झालेल्या आरोपीला १५ तासांत बेड्या

खुनाच्या गुन्ह्यात दवाखान्यातून पसार झालेल्या आरोपीला १५ तासांत बेड्या

 कोपरगाव :-  तालुक्यातील धोत्रे येथील शेतकरी रावसाहेब पुंजाबा गागरे यांच्या अंगावर गाडी घालून त्यांचा खून करणारा आरोपी अमोल शिंदे हा उपचारादरम्यान छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातून पळून गेला होता. त्याला रविवारी (२० ऑक्टोबर) कोपरगाव तालुका पोलिसांनी अहिल्यानगर येथील एका लॉजमधून अटक केली. कोपरगाव न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

जाहिरात

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवीगाळ केल्याची तक्रार पोलिसांत देण्यासाठी चाललेल्या रावसाहेब पुंजाबा गागरे (वय ५५) यांच्या अंगावर कार घालून अमोल बळीराम शिंदे याने त्यांचा खून केला होता. गुरुवारी (१७ ऑक्टोबर) रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली होती. या घटनेत जखमी झाल्याने अमोल शिंदे हा वैजापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. पोलिसांनी त्यास छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात हलवले. कोपरगाव पोलिसांच्या बंदोबस्तात तो उपचार घेत होता. मात्र, शनिवारी तो तेथून पसार झाला. अहिल्यानगर शहरातील एका लॉजमध्ये तो लपल्याची माहिती पोलिस निरीक्षक संदीप कोळी यांना मिळाली. त्यानुसार, पोलिस पथकाने आरोपी शिंदे व त्याने गुन्ह्यात वापरलेली कार ताब्यात घेतली. न्यायालयाने त्यास पांच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, आरोपी पसार झाल्यानंतर त्याला १५ तासांत शोधण्यात पोलिसांना यश आले. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांवरील कारवाई टळली आहे.



संपादक रवींद्र जगताप
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे