ब्रेकिंग

युवक आणि शेतकरी हितासाठी विधान परिषदेत आवाज बुलंद करणार – आमदार विवेकभैय्या कोल्हे

युवक आणि शेतकरी हितासाठी विधान परिषदेत आवाज बुलंद करणार – आमदार विवेकभैय्या कोल्हे
शेतमालाला योग्य दर आणि बाजारभाव मिळाला पाहिजे, हीच आमची भूमिका आहे.वरिष्ठ सभागृहात शेतकरी हितासाठी सरकारकडे आग्रह धरणारा व युवकांचा हक्काचा प्रतिनिधी म्हणून काम करणार आहे.तुमच्या न्याय आणि हक्कासाठी आवाज उठवणारा घरातील व्यक्ती विधान परिषदेमध्ये गेलेला आहे, या माध्यमातून शेतकऱ्यांचे हिताचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.
सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे गुरुवार दिनांक २१ मे २०२६ रोजी विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे यांच्या नागरी सत्काराचा भव्य सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे उपस्थित होते. सत्कारमूर्ती म्हणून विधान परिषदेचे आमदार विवेकभैय्या कोल्हे यांचा ग्रामस्थांच्या वतीने मिरवणूक काढत सत्कार करण्यात आला.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे नेते भारतशेठ कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र चव्हाणके, माजी पंचायत समिती सभापती बाळासाहेब वाघ, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विठ्ठलराजे भोसले, शैक्षणिक क्षेत्रातील राजेश गडाख, प्रणवदादा पवार, कथले सर, अंबादास कदम आदीसह मान्यवर उपस्थित होते.यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार विवेकभैय्या कोल्हे पुढे म्हणाले की, या आमदारकीचा सातबारा जरी माझ्या नावावर असला, तरी या सातबाराच्या पोट हिस्सामध्ये सर्व कार्यकर्त्यांचा समान हिस्सा आहे. कोल्हे कुटुंबीय आणि पाथरे पंचक्रोशीचे एक अतूट व जिव्हाळ्याचे नाते आहे. संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या उभारणीपासून या भागातील अनेक सभासद, कर्मचारी आणि शेतकरी ‘तीन रुपये हजेरी’ प्रमाणे कामासाठी येत असत. त्या काळापासून सुरू झालेला हा संबंध आज तिसऱ्या पिढीपर्यंत पोहोचला असून, अनेक ज्येष्ठ सहकाऱ्यांनी स्वर्गीय कोल्हे साहेबांसोबत कार्य केले आहे. त्यांच्या योगदानाचे स्मरण करणे ही आजची गरज आहे.ते पुढे म्हणाले की, पाथरे, शहा, पंचाळे परिसर पूर्वी दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता. स्वर्गीय कोल्हे साहेब १९६२ साली पंचायत समितीचे सभापती झाले, तर त्याआधीच १९५८ साली संजीवनी सहकारी साखर कारखान्याची पायाभरणी करण्यात आली होती. त्या काळापासून आजपर्यंत स्वर्गीय कोल्हे साहेबांचे या भागावर विशेष प्रेम आणि जिव्हाळा कायम राहिला आहे. तसेच मी तो जिव्हाळा यापुढेही असाच जपून ठेवणार आहे. असे सांगून पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांचे त्यांनी आभार व्यक्त केले.कार्यक्रमास सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, पाथरे विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, कोपरगाव येथील सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मंडळ, कोपरगाव नगरपालिकेचे उपाध्यक्ष जितेंद्र रणशूर व सर्व नगरसेवक, कोपरगाव बाजार समितीचे सभापती व संचालक मंडळ, शिवसेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर गाडे तसेच कार्याध्यक्ष पिराजी पवार यांची उपस्थिती लाभली. विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित होते.यावेळी सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व संचालक मंडळ, खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष व संचालक मंडळ, सिन्नर नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक, तसेच पंचाळे, मिरगाव, सायाळे, कोळगाव, झापेवाडी, विधनवाडी, शहा व कारवाडी येथील ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच व सदस्य मंडळ यांची उपस्थिती होती.यावेळी आर. बी. चिने सर, शिवाजीकाका चिने, अशोकराव नरोडे, दौलत चिने, पाथरे खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्य मंडळ, तसेच पाथरे विकास सोसायटीचे अध्यक्ष व संचालक मंडळ उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन जालिंदर थोरात व समस्त ग्रामस्थ, पाथरे यांनी केले होते. कार्यक्रमाची प्रस्तावना जालिंदर थोरात यांनी केली. सूत्रसंचालन मनोज गवळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन कृष्णा घुमरे यांनी केले.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे