ब्रेकिंग

रितेश सुभाष होन यांनी वयाच्या 21 व्या वर्षी SkillCrunch Private Limited ची स्थापना करून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक महत्वाची ओळख निर्माण केली…

रितेश सुभाष होन यांनी वयाच्या 21 व्या वर्षी SkillCrunch Private Limited ची स्थापना करून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक महत्वाची ओळख निर्माण केली…

कोपरगाव प्रतिनिधी:-रितेश सुभाष होन यांनी वयाच्या 21 व्या वर्षी *SkillCrunch Private Limited* ची स्थापना करून तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात एक महत्वाची ओळख निर्माण केली आहेत
त्यांनी तयार केलेले *Recharge Karo* ऍप सध्या 5 लाखांहून अधिक वापरकर्ते वापरत असून, हे जागतिक स्तरावर उपलब्ध आहे. यामधून वापरकर्ते विविध कामे करून कमाई करू शकतात. याशिवाय, *SkillCrunch* ऍपने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शिकण्याच्या आणि नोकरी तसेच इंटर्नशिपच्या संधी मिळवण्याच्या प्रक्रियेत मोठी मदत केली आहे. हे ऍप हॅकेथॉन, इंटर्नशिप, नोकऱ्या आणि इतर संधींबाबत जलद अपडेट्स देते, त्यामुळे विद्यार्थी कोणतीही संधी गमावू नयेत.

जाहिरात

नुकतेच त्यांनी *Unstag* हे कॉलेज-आधारित कॉन्फेशन ऍप लॉन्च केले आहे. यात महाविद्यालयीन विद्यार्थी आणि पदवीधर आपली गुपितं, गॉसिप्स, क्रश, घटना आणि कॉन्फेशन्स अनामिकपणे शेअर करू शकतात. वापरकर्त्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाते, ज्यामुळे त्यांना मोकळेपणाने व्यक्त होता येते. या ऍपच्या लॉन्च पार्टीत संपूर्ण टीमने मोठ्या उत्साहात आपल्या मेहनतीचा आनंद साजरा केला.रितेश होन यांच्या नेतृत्वाखालील कंपनीमध्ये सध्या 20 हून अधिक सदस्य कार्यरत आहेत. त्यांचे *Chief Executive Officer* म्हणून रितेश होन, *Chief Operating Officer* म्हणून आदित्य बोठे, *Chief Design Officer* म्हणून विवेक पाहीलवाण, आणि *Chief Marketing Officer* म्हणून सचिन साळवे काम पाहत आहेत.Unstag ऍप लवकरच अॅपल अॅप स्टोअर आणि गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार आहे. रितेश होन यांचा तंत्रज्ञान क्षेत्रातील अनुभव खूपच व्यापक आहे. त्यांनी आपल्या डिप्लोमा काळात टोकियो, जपान आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेत इंटर्नशिप पूर्ण केली आहे. तसेच, जपानमधील कंपनीत दोन वर्षे आणि अमेरिकेत दोन वर्षे काम केल्याचा अनुभव त्यांना आहे.रितेश यांची कंपनी आज या उंचीवर पोहोचण्यामागे त्यांचे कुटुंबीयांचे मोलाचे योगदान आहे. त्यांचे वडील सुभाष हरिभाऊ होन, आई सारिका सुभाष होन यांनी नेहमी त्यांना आधार दिला. त्यांचा भाऊ, सॉफ्टवेअर इंजिनिअर *सर्वेश सुभाष होन*, जो सध्या, पूणे येथे काम करतो, त्यांचा पाठिंबा हे रितेश यांच्या यशाचे मुख्य स्तंभ आहेत. सर्वेशने त्यांना प्रत्येक चढ-उतारांमध्ये साथ दिली आहे.रितेश होन हे त्यांचे स्टार्टअप पुढील पातळीवर घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे ते अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत की, योग्य कौशल्ये आणि मेहनत असेल तर सर्व काही शक्य आहे. Unstag च्या यशस्वी लॉन्चमुळे त्यांच्या कंपनीचे नाव अधिक उंचावर गेले आहे.



संपादक :- रवींद्र जगताप
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे