महाराष्ट्र

मंगळवार (दि.०५) रोजी कर्मवीर शंकररावजी काळे यांचे १२ वे पुण्यस्मरण

मंगळवार (दि.०५) रोजी कर्मवीर शंकररावजी काळे यांचे १२ वे पुण्यस्मरण

             

कोपरगाव   शिक्षण सेवेचा वसा घेवून रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य निस्वार्थ सेवेतून पुढे चालविणाऱ्या व सहकार,सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटविणारे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक, माजी खासदार स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १२ व्या पुण्यस्मरण निमित्त मंगळवार (दि.०५) रोजी सकाळी ९.०० वाजता पुष्पांजली कार्यक्रम होणार आहे. तसेच सकाळी १०.०० ते १२.०० या वेळेत प्रसिद्ध कीर्तनकार ज्ञानसिंधू ह.भ.प. संदिपान महाराज शिंदे (हसेगावकर), अध्यक्ष- सदगुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, आळंदी देवाची यांचा जाहीर हरी किर्तनाचा कार्यक्रम कर्मवीर शंकरराव काळे स्मृती उद्यान येथे होणार आहे. अशी माहिती कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष कारभारी आगवण यांनी दिली आहे.

जाहिरात

जाहिरात

सालाबाद प्रमाणे याहिवर्षी स्व.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्या १२ व्या पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी माजी आमदार अशोकराव काळे, गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ. पुष्पाताई काळे, आ. आशुतोष काळे, जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ. चैतालीताई काळे तसेच कारखान्याचे व्हा.चेअरमन, संचालक मंडळ, कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे सर्व सदस्य व विविध सलग्न संस्थांचे चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक, पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या पुण्यस्मरण कार्यक्रमासाठी स्व. कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांवर व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना, उद्योग समुह व काळे परिवारावर प्रेम करणा-या हितचिंतक तसेच रयत परिवाराने आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे उपाध्यक्ष नारायणराव मांजरे यांनी केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे