महाराष्ट्र

सोमैया महाविद्यालयाच्या दोन छात्रसैनिकांची स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सशस्त्र सीमा बल यामध्ये निवड

सोमैया महाविद्यालयाच्या दोन छात्रसैनिकांची स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सशस्त्र सीमा बल यामध्ये निवड

स्थानिक के. जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे दोन छात्रसैनिक ऋषिकेश मढवई व मयूर पळसकर यांची स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत सशस्त्र सीमा बलाच्या तुकडीमध्ये कॉन्स्टेबल (जी.डी.) या पदावर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. विजय ठाणगे यांनी येथे दिली.

जाहिरात
जाहिरात

 या संदर्भात अधिक माहिती देताना छात्र सेना प्रमुख कॅप्टन डॉ. नितीन शिंदे म्हणाले की, “महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे छात्रसैनिक ऋषिकेश मढवई व मयूर पळसकर यांची गृह मंत्रालयाच्या (भारत सरकार) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत क्रमशः सशस्त्र सीमा बल  व इंडो तिबेटियन बॉर्डर फोर्स मध्ये कॉन्स्टेबल (जी.डी.) या पदावर गुणवत्तेच्या आधारे निवड झाली आहे. या निवडीसाठी दोन्ही छात्रसैनिक गेल्या अनेक महिन्यांपासून कठोर परिश्रम घेत होते. त्यांच्या परिश्रमाला फळ आल्याचे विशेष समाधान आहे.”
ऋषिकेश मढवई व मयूर पळसकर यांचे या निवडीबद्दल कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. अशोकराव रोहमारे व सचिव ऍड संजीव कुलकर्णी, विश्वस्त मा. संदीप रोहमारे, प्राचार्य डॉ. विजय ठाणगे आदींनी विशेष अभिनंदन केले आहे.  तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. या दोन्ही छात्र सैनिकांना छात्रसेना प्रमुख कॅप्टन डॉ. नितीन शिंदे व लेफ्टनंट प्रा. वर्षा आहेर यांचे मार्गदर्शन लाभले.

जाहिरात
जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे