राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमात प्रा. डॉ. कमलाकर गायकवाड यांचे व्याख्यान
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमात प्रा. डॉ. कमलाकर गायकवाड यांचे व्याख्यान
कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील मार्गदर्शक व महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित समाज श्री प्रशांत हिरे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाचे सहाय्यक प्रा. डॉ. कमलाकर गायकवाड यांनी भारती विद्यापीठ संचलित हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी पुणे यांनी आंबी गावात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विशेष हिवाळी शिबिरात संघकार्य व नेतृत्व, व नेतृत्व बांधणी आदि विषयांवर मार्गदर्शन केले.या शिबिरात श्रमदान, स्वच्छता व जनजागृती या व्यतिरिक्त विद्यार्थ्यानी अनेक समाजोपयोगी उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला. सुरवातीस प्रा.डॉ.गायकवाड यांनी शिबिरार्थिना एनएसएस ची स्थापना,एनएसएस चे ब्रीद वाक्य, उद्देश, मध्यवर्ती कल्पना व घटक या विषयीची सविस्तर माहिती दिली.तसेच प्रा.डॉ.गायकवाड यांनी आपल्या व्याख्यानात संघ, संघ कार्य, संघ बांधणी मधील टप्पे व संघ कार्याची प्रमुख वैशिष्ठे सोदाहरण स्पष्ट करून सांगितली.



तसेच संघ नेतृत्व, नेतृत्वाची वैशिष्ठ्ये, संघ नायकाचे गुण तसेच संघ नायक व संघ सहकारी यांच्यातील नातेसंबंध तसेच हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील यशस्वी उद्योजक या सर्व मुद्द्यांवर विनोदी शैलीत सांगोपांग चर्चा केली.या हिवाळी शिबिरास एकूण ५० विद्यार्थ्यानी सहभाग घेतला.

हया कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, आभारप्रदर्शन व समारोप हया सर्व गोष्टीत एनएसएस विद्यार्थ्यानी सक्रिय सहभाग घेतला. तसेच विद्यार्थी प्रतिनिधी तेजस गायकवाड, भार्गव गोसावी, ऋतुपर्ण सुद्रिक, ईशा पवार व साक्षी नाळे यांचे विद्यार्थ्यांना सहकार्य व मार्गदर्शनइत्यादी बाबतचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले.
या हिवाळी शिबिराचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ ललिता चिरमुले व एनएसएस प्रोग्राम ऑफिसर श्री स्वप्नील पवार यांनी यशस्वीरीत्या उत्कृष्ठ पद्धतीने पार पाडले.

एनएसएसच्यां या शिबिरात प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रण दिल्याबद्दल प्रा डॉ कमलाकर गायकवाड यांनी भारती विद्यापीठाच्या तसेच हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ चिरमुले मॅडम व संयोजक श्री स्वप्नील पवार सर यांचे विशेष आभार मानले.



