ब्रेकिंग

नवर्षाच्या पूर्वसंध्येला तरुणाईचा वाचन संकल्प कोपरगाव नगरपालिका वाचनालयात ग्रंथप्रदर्शन

नवर्षाच्या पूर्वसंध्येला तरुणाईचा वाचन संकल्प कोपरगाव नगरपालिका वाचनालयात ग्रंथप्रदर्शन

कोपरगाव- नववर्षाच्या मुहूर्तावर जिल्हा ग्रंथालय कार्यालयाच्या वतीने वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी विविध उपक्रमांची आखणी करण्यात आली आहे. आगामी पंधरवाड्यात ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ अंतर्गत वाचनस्नेही उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने कोपरगाव नगरपरिषद संचलित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयात दोन दिवसीय ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. नगररचना अधिकारी अश्विनी पिंगळ व उपमुख्याधिकारी मनोजकुमार पापडीवाल यांच्या हस्ते फीत कापून ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

जाहिरात
जाहिरात

यावेळी नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, ग्रंथालय वाचक तसेच समता अभ्यासिकेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी यासाठी कोपरगाव नगरपरिषदेचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय सातत्याने उपक्रमशील राहिले आहे.

जाहिरात

30 आणि 31 डिसेंबर या दोन दिवशी ग्रंथ प्रदर्शन वाचकांसाठी खुले असणार आहे. या प्रदर्शनात कथा, कादंबरी, व्यक्तिमत्व विकास, स्पर्धा परीक्षा आदी विषयांवरील पुस्तके मांडण्यात आली आहे. अधिकाधिक शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ग्रंथप्रदर्शनाचा लाभ घ्यावा. तसेच नववर्षाचा संकल्प म्हणून वाचनालयाचे सभासद व्हावे असे आवाहन मुख्याधिकारी सुहास जगताप यांनी केले आहे.

जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे