ब्रेकिंग

प्रा.डाॅ. कमलाकर गायकवाड यांचे नविन शैक्षणिक धोरणांवर व्याख्यान संपन्न.

जाहिरात
जाहिरात
जाहिरात

प्रा.डाॅ. कमलाकर गायकवाड यांचे नविन शैक्षणिक धोरणांवर व्याख्यान संपन्न.

कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील संशोधक मार्गदर्शक व महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय नामपूर तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथील वरिष्ठ स .प्रा.व इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.कमलाकर गायकवाड यांनी नुकताच संपर्क अभियान स्कूल कनेक्ट २.० ह्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना व्याख्यान दिले. डॉ.कमलाकर गायकवाड यांनी बारावीच्या विद्यार्थ्यांना नविन शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले . या व्याख्यानात त्यांनी एनईपी ची ओळख, प्रस्तावना, ध्येय, उद्दिष्टे, रचना आणि फायदे इत्यादी बाबी सोडहरणासह समजावून सांगितल्या. या व्याख्यानासाठी इयत्ता १२ वी चे सुमारे ८० विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. महाले, प्रा. बागुल आदींनी मोलाचे सहकार्य केले. मा. प्राचार्य डॉ. दिनेश शिरुडे यांनी विद्यार्थ्यांना एनईपी महत्व विनोदी शैलीत सांगितले. एनईपी बाबतची माहिती विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनासाठी खूपच फायदेशीर ठरेल असे वक्तव्य प्रा बागुल यांनी केले. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन उपप्राचार्य प्रा. सुनील वाघ यांनी केले. .

जाहिरात
जाहिरात
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे