अहिल्या नगर जिल्ह्यातील दलित अत्याचार घटनेच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सचिव अँड गोरक्ष लोंखडे यांच्याशी सकल आंबेडकरी समाजाचे कोपरगाव तालुका अध्यक्ष प्रकाश दुशिंग यांची चर्चा
अहिल्या नगर जिल्ह्यातील दलित अत्याचार घटनेच्या संदर्भात महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सचिव अँड गोरक्ष लोंखडे यांच्याशी सकल आंबेडकरी समाजाचे कोपरगाव तालुका अध्यक्ष प्रकाश दुशिंग यांची चर्चा
नुकतेच महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सचिव अँडव्हाँकेट गोरक्ष लोखंडे यांचे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शिर्डी येथे बैठक संपन्न झाली. याप्रसंगी ते शिर्डीत आले होते. आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी त्यांची भेट घेऊन अहिल्या नगर जिल्ह्यातील दलित अत्याचाराच्या विविध घटना घडल्या आहेत या घटना संदर्भात चर्चा करून आरोपींना शिक्षा व्हावी तसेच पीडितांना न्याय मिळावा यासाठी चर्चा झाली आहे. शिर्डी येथे सागर शेजवळ यांच्या राहत्या घरी एडवोकेट गोरक्ष लोखंडे यांनी भेट दिली. शिर्डी येथील सागर शेजवळ खून प्रकरण व हरेगाव येथील दलित तरुणांवर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भात एडवोकेट गोरक्ष लोखंडे सदस्य सचिव दर्जा महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग वरळी मुंबई यांच्याशी चर्चा करून दलित समाजाला न्याय देण्यासाठी सकल आंबेडकर समाज कोपरगाव तालुका व शहराध्यक्ष प्रकाश दुशिंग आकाश शेजवळ यांची सविस्तर चर्चा झाली. शिर्डी तसेच हरेगाव प्रकरणात अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सचिव म्हणाले की,यावर लक्ष घालू व पिडितांना न्याय मिळवुन देवु असे आश्वासन दिले.सकल आंबेडकर समाज कोपरगाव तालुका व शहर अध्यक्ष प्रकाश दुशिंग,नॅशनल दलित मॉमेंट फॉर जस्टीस या संघटनेचे राज्य महासचिव एडवोकेट मा.केवलजीओके साहेब व राज्यसचिव मा.वैभवजी गीते,आकाश शेजवळ,सुभाषराव शेजवळ,अमोलजी शिंदे,नानाभाऊ गुंजाळ, तुषार शेजवळ विशाल शिंदे आदी याप्रसंगी उपस्थित होते तसेच सागर शेजवळ प्रकरण केस इन कॅमेरा कोर्टात चालू करावी व सागर शेजवळ खून प्रकरणात सरकारी वकील प्रकाश आहेर यांची नियुक्ती व्हावी अशी मागणी करण्यात आली. हरेगाव प्रकरणातील शुभम माघाडे,कुणाल मगर या मुलांना आरोपी त्रास देत आहे. हरेगाव येथील मुलांना आरोपीकडून होणाऱ्या धमकी व अडथळे दूर करावे अशा विविध प्रकरणात चर्चा करण्यात आली आहे.हरेगाव प्रकरणात पोलिस अधिक्षक यांच्याशी चर्चा करुन त्यांना सुचना करून पिडितांना संरक्षण देवु असे अँड लोंखडे म्हणाले आहे.तसेच कोपरगाव येथील- विशाल शिंदे यांना वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर तत्काळ सेवेत सामावून घ्यावे कोपरगाव शहरातील विशाल शिंदे यांचे अनुकंम्पा तत्वावरील नोकरी संदर्भात चर्चा करण्यात आली आहे. विशाल शिंदे यांचा अनेक वर्षापासून नोकरीचा विषय प्रलंबित आहे.तो प्रश्न त्वरित सोडवावा.शिर्डीतील- श्री.गौतम रामचंद्र दिवे यांची मुलगी कु. श्रध्दा गौतम दिवे ही बाहेर देशामध्ये (रशिया) MBBS MEDICAL SCIENCE शिक्षण घेत आहे.त्या गरिबाला NSFDC-EL- B शैक्षणिक कर्ज प्रकरण मंजूर करण्यात यावी.अशा विविध दलित समाजाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली होती.याप्रसंगी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सचिव अँडव्हाँकेट गोरक्ष लोखंडे यांचे सकल आंबेडकरी समाजाच्या वतिने त्यांचा सत्कार करुन त्यांचे आभार मानले आहे.




