कोपरगांवचे माजी उपनगराध्यक्ष…जनसंघाचे नेते सुधाप्पा कुलकर्णी यांचे निधन…




कोपरगांवचे माजी उपनगराध्यक्ष…जनसंघाचे नेते सुधाप्पा कुलकर्णी यांचे निधन…
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगांव नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, प्रगतशील शेतकरी स्व. सुधाकर तथा सुधाप्पा गोपाळराव कुलकर्णी ( वय ८९) यांचे वृध्दपकाळाने कोपरगांव येथील राहते घरी (जोशी नगर) रविवार दि. २६ जानेवारी २०२५ रोजी रात्री ०८ :२५ वाजता दुख:द निधन झाले आहे.

त्यांचे पार्थिवावर सोमवार दि. २७ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ०९:०० वाजता अमरधाम,गोदातीर, कोपरगांव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत वाढलेल्या सुधाप्पा यांचेवर राष्ट्र विचाराचा मोठा पगडा होता. जनसंघाचे दिवंगत नेते दीनदयाळ उपाध्याय यांचेशी त्यांचा व्यक्तीशः परिचय राहिला. जनसंघाचे नेते दीनदयाळ उपाध्याय यांनी सुधाप्पा कुलकर्णी यांचे निवासस्थानी मुक्कामी राहून कोपरगांव परिसरात जनसंघ पक्ष वाढीसाठी त्यांचे समवेत प्रवास केला आहे. कोपरगांव नगरपरिषदेचे नगरसेवक ते उपनगराध्यक्ष या तत्कालिन प्रवासात कोपरगांव शहर विकसात सुधाप्पा यांचे महत्वपुर्ण योगदान राहिले आहे. येसगांव येथील प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची स्वतंत्र ओळख राहिली आहे.

त्यांचे पच्छात पत्नी मीना एक मुलगा, विवाहित मुलगी सुचेता, जावई, नातू, पणतू असा परिवार आहे.मर्चन्ट नेव्ही चे कॅप्टन सचिन यांचे ते वडील होते.
संपादक :- रवींद्र जगताप
सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा
अहिल्यानगर जिल्ह्यात वर्षभरात 16392 गुन्हेतर १२०१५ गुन्हांचा छडा लावण्यास पोलिसांना यश
सविस्तर बातमीसाठी खालिल लिंक दाबा
संपादक :- रवींद्र जगताप

