क्रिडा व मनोरंजन

विद्यार्थ्यांच्या  सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी वार्षिक क्रीडा महोत्सव संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडिअम स्कूल येथेे मोठ्या उत्साहात संपन्न

 

विद्यार्थ्यांच्या  सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी वार्षिक क्रीडा महोत्सव संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडिअम स्कूल येथेे मोठ्या उत्साहात संपन्न

संपादक:- रवींद्र जगताप

कोपरगाव :- विद्यार्थ्यांचा विकास व्हावा यासाठी संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या वतीने विविध उपक्रम राबवले जात असतात विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातही संधी मिळावी यासाठी संत ज्ञानेश्वर स्कूलच्या वतीने तीन दिवसीय क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.संत ज्ञानेश्वर इंग्लिश मिडिअम स्कूल येथे दि.२१,२२,२३ डिसेंबर रोजी १२ व्या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव तालुका क्रीडा संकुल चे सदस्य व ज्येष्ठ क्रीडा शिक्षक राजेंद्र पाटणकर सर व संत जनार्दन स्वामी महर्षि विद्या मंदिर चे क्रीडा विभाग प्रमुख शिवप्रसाद घोडके सर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विशाल झावरे,सदस्य पोपट झुरळे,विक्रांत झावरे,शंकर यादव,सचिन मोरे,इरफान शेख,अश्विनी होणे,पंच वेदांत करपे,साई हलवाई यांनी केले. तसेच मान्यवरांच्या हस्ते मेजर ध्यानचंद,संत ज्ञानेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वतीचे प्रतिमा पूजन करून व क्रीडा ज्योत प्रज्वलित करून क्रीडा महोत्सवचे उद्घाटन करण्यात आले. या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवात व्हॉलीबॉल,थ्रोबॉल,कबड्डी,खो-खो, रनिंग,रिले, क्रिकेट, स्किपिंग,हाय जंप,लॉंग जंप,थाळीफेक,गोळा फेक, बॅडमिंटन,कॅरम,चेस या खेळांचा समावेश करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेतून शिक्षिका चैतली पुंडे यांनी शालेय क्रीडा क्षेत्राचा आढावा सादर केला.

आजच्या काळात विद्यार्थ्यांना मोबाईल हा मैदानापासून दूर नेण्यास भाग पाडत आहे. बरेचसे मैदानं ओस पडले आहेत.ज्या शाळेचे मैदान जिवंत ती शाळा लौकिकास पात्र असते.त्यामुळे बाल वयापासूनच खेळत रहा आणि आपले शरीर निरोगी ठेवा असे मार्गदर्शन राजेंद्र पाटणकर सर यांनी विद्यार्थ्यांना केले.क्रीडा स्पर्धेतून विद्यार्थ्यांना आपल्या सुप्त कलागुणांना वाव देण्याची व तालुका,जिल्हा,विभाग ,राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाण्याची संधी मिळते. नुकत्याच झालेल्या ऑलंपिक स्पर्धेत शितल देवी या अपंग मुलीने भारताला सुवर्णपदक कसे मिळवून दिले याचे उदाहरण देत शिव प्रसाद घोडके यांनी सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.‌ शिक्षिका ऋतुजा कुलकर्णी यांनी सर्व विद्यार्थ्यांना शपथ दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका निकम यांनी केले तर आभार गीतांजली आहेर यांनी मानले.या कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे विद्यार्थी, पालक,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे