ब्रेकिंग

वेळापुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या सौ. सविता शिंदे

जाहिरात
जाहिरात
जाहिरात

वेळापुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या सौ. सविता शिंदे

कोपरगांवः- तालुक्यातील राजकीयदृष्टया महत्त्वाच्या असलेल्या वेळापुर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी कोल्हे गटाच्या सौ. सविता एकनाथ शिंदे यांची नुकतीच निवड झाली. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून ग्राम विकास अधिकारी मधुकर पगारे यांनी काम पाहिले. अपक्ष निलेश काळे यांचा पराभव झाला. उपसरपंच सौ सविता शिंदे यांचे संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी अभिनंदन केले.

जाहिरात
जाहिरात

याप्रसंगी कोल्हे गटाचे सरपंच वैशाली सतिष भोसले, ग्रामपंचायत सदस्य सतिष बोरावेक, दिपक पवार, रोहिणी रावसाहेब मोकळ, अनिता अरूण खुरसणे तर काळे गटाचे गणपत गोरे, संकेत मेहेत्रे, उषा अशोक पवार उपस्थित होते. श्वेता वाल्मीक काटे या सदस्या अनुपस्थित होत्या.नवनिर्वाचित उपसरपंच सौ. सविता एकनाथ शिंदे यांचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष राजेंद्र कोळपे, संचालक विलासराव वाबळे, मोहनराव वाबळे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. वेळापुर गांव विकासाच्या योजना राबविण्यासाठी काम करू असे सौ. सविता शिंदे म्हणाल्या.

जाहिरात

याप्रसंगी सर्वश्री. सीताराम वाळके,रावसाहेब मोकळ, सचिन गोरे, प्रशांत वाबळे, सतिश भोसले, एकनाथ शिंदे, अरूण खुरसणे, माजी पोलिस उपनिरीक्षक शंकरराव मोकळ, हेमंत पंडोरे, प्रशांत मोकळ आदि उपस्थित होते.



संपादक :- रवींद्र जगताप

सत्य एक्सप्रेस न्युजच्या व्हाँटसाँप ग्रुपवर सहभागी होण्यासाठी खालील लिंक दाबा

https://chat.whatsapp.com/JywJRdA1v4oJ19TOQro9T2

अहिल्यानगर जिल्ह्यात वर्षभरात 16392 गुन्हेतर १२०१५ गुन्हांचा छडा लावण्यास पोलिसांना यश

सविस्तर बातमीसाठी खालिल लिंक दाबा

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे