लोकशाहिर डॉ. अण्णाभाऊ साठे खुलेनाट्य गृहाचे काम त्वरीत सुरु करावे अन्यथा तिव्र स्वरुपाचे आंदोलन करु :- अनिल जाधव
लोकशाहिर डॉ. अण्णाभाऊ साठे खुलेनाट्य गृहाचे काम त्वरीत सुरु करावे अन्यथा तिव्र स्वरुपाचे आंदोलन करु :- अनिल जाधव
कोपरगाव शहरातील लोकशाहीर डाँ.अण्णाभाऊ साठे खुले नाट्य गृह धूळ खात पडले आहे, गेली अनेक वर्षापासून कोपरगाव नगरपरिषद या विषयाकडे दुर्लक्ष करीत आहे.लोकशाहिर डॉ. अण्णाभाऊ साठे खुलेनाट्य गृहाचे काम त्वरीत सुरु करावे यासाठी लहुजी शक्ती सेनाचे तालुका अध्यक्ष अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले आहे. पुढे निवेदनात म्हटले आहे की, मातंग समाजाच्या व कलाकारांच्या भावनेशी नगरपरिषद खेळत आहे. सदर विषयासंदर्भात अनेक आंदोलने व उपोषणे केली तरी सदर कामाची दखल नगरपरिषदेने घेतली नाही. सदर कामासाठी लागणार निधीही उपलब्ध झालेला असून अनेक वेळा निविदा काढून काम बंद करण्यात आले आहे. . केवळ लोकशाहिर. अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात आले म्हणून सदर काम सुरु करण्यास टाळाटाळ करीत आहे.असे वाटते,येत्या आठ दिवसात जर या कामाची निविदा नगरपरिषदेने काढली नाही तसेच सदर जागेच्या आजुबाजुचे अतिक्रमण काढले नाही तर सकल समाज रस्त्यावर उतरुन तीव्र स्वरुपाचे आंदोलन करु असा इशारा निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.सदरचे निवेदन २८ जानेवारी २०२५ रोजी मुख्याधिकारी सुहास जगताप यांना देण्यात आले आहे.याप्रसंगी लहुजी शक्ती सेनेचे तालुकाध्यक्ष अनिल जाधव, अर्जुन मोरे,संदीप निरभवणे अध्यक्ष लोकशाहिर आण्णाभाऊ साठे चालक मालक वाहतूक संघटना,नवनाथ ताकवले,गौरव लोंखडे,अमोल साळवे,अप्पासाहेब आव्हाड,संतोष खुडे,लखन साठे, सचिन त्रिभुवन,दिनेश भालेराव किरण अढांगळे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.



