महाराष्ट्र

कोपरगाव शहरातील विविध महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा

कोपरगाव शहरातील विविध महिला मंडळाच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा
कोपरगाव :- कोपरगाव शहरातील ज्येष्ठ महिला समिती, वनिता महिला मंडळ, ब्राह्मण महिला मंडळ,जिजाऊ महिला मंडळ,गुजराती महिला मंडळ आदी महिला मंडळांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचा आखीव रेखीव भरगच्च असा कार्यक्रम गौतम बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.पुष्पाताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत एकत्रितपणे मोठ्या उत्साहात, आनंदात व जल्लोषात पार पडला असून या कार्यक्रमासाठी महिला भगिनींनी भरभरून उपस्थिती दर्शविली होती.
यावेळी उपस्थित सर्वच महिला मंडळाच्या सदस्या व महिला भगिनींनी पासिंग पार्सल,चमचा लिंबू, संगीत खुर्ची, गाण्याच्या भेंड्या,सागर गोटे, फनी गेम अशा विविध मजेशीर खेळातून आनंद लुटला. महिला दिनाचा कार्यक्रम कोपरगाव शहरातील सर्वच महिला मंडळांना एका छताखाली एकत्रित करून महिला दिन साजरा करण्याचा मानस उत्तमरीत्या यशस्वी पार पडला. यावेळी वनिता मंडळाच्या सभासद सौ. ऐश्वर्याताई सातभाई यांना मनस्विनी पुरस्कार मिळाल्याबद्दल व वनिता मंडळाच्या सभासद सौ. श्रद्धा जवाद यांचा अंताक्षरी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा देखील सत्कार करण्यात आला. यामध्ये सौ. मनीषा बार, बिंड मॅडम, सौ. मगर, सौ.उमा ताई वहाडणे, सोनिया रणदिवे, अशा विविध क्षेत्रात नैपुण्य दाखवणाऱ्या महिलांचे सत्कार करण्यात आले
या कार्यक्रमासाठी वनिता मंडळाच्या अध्यक्षा सौ वंदना चिकटे सौ.शैलालावर ,वृषाली किर्लोस्कर, वैदही किर्लोस्कर, विद्या गोखले, हर्षदा पटवर्धन, वर्षा गंगुले तसेच ज्येष्ठ महिला समितीच्या अध्यक्षा रजनीताई गुजराती, सौ. सुधा ठोळे, जयश्री शहा, शैलाताई रोहम,माधवीताई नेने, चंदाताई कोठारी तसेच ब्राह्मण महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. श्रद्धा जवाद, सौ. रेणुका नाईक, मधुरा जोशी, जिजाऊ महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. प्रतिभा शिलेदार, सौ. स्वप्नजा वाबळे, आरती शिंदे, तपसे ताई, श्रीम. उषाताई वाबळे गुजराती महिला मंडळाच्या सौ.जोबन पुत्रा,पटेल ताई या सर्व महिलांनी हा एकत्रित महिला दिन साजरा करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.आभार सौ.वंदनाताई चिकटे यांनी मानले. यावेळी मस्त लज्जतदार पावभाजी चा आस्वाद घेऊन कार्यक्रमाची मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे